ही आहे नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी..

By चैतन्य गायकवाड |

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील (Nashik district) कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यात सोमवारी (दि. २०) कोरोना बाधितांच्या (Corona cases) संख्येत ३० च्यावर वाढ झाली आहे. सोमवारी ३८ नवीन कोरोना बाधित (new corona cases) आढळून आले आहे. त्यात २१ बाधित हे नाशिक महानगरपालिका (NMC) क्षेत्रातील असून, नाशिक ग्रामीण भागातील १५ रुग्ण आहेत. तर जिल्हाबाह्य २ कोरोना बाधितांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे मालेगाव महानगरपालिका (Malegaon Municipal Corporation) हद्दीत एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही. तर दिवसभरात जिल्ह्यात एकूण १८ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दरम्यान, दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात रविवारी (दि. १९) ३९ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर काल दिवसभरात ३८ कोरोना बाधित आढळले. जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण १७८ कोरोनाबाधित उपचार (active corona cases) घेत आहे. विशेष म्हणजे काल दिवसभरात एकही कोरोना मृत्यू झालेला नाही. तर जिल्ह्यातील आजपर्यंतच्या एकूण कोरोना मृतांची संख्या ८८९९ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधितांची संख्या ४ लाख ७६ हजार ४४७ इतकी झाली आहे. त्यातील ४ लाख ६७ हजार ३७० रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोना मुक्ततेचे प्रमाण ९८.०९ टक्के इतके आहे. दरम्यान, जिल्ह्यातील प्रलंबित कोरोना अहवालांची संख्या ४४२ इतकी आहे. नाशिक जिल्ह्यातील सकारात्मकता दर (positivity rate) २.८४ टक्के इतका आहे.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या… गेल्या काही दिवसांपासून देशात सतत १२ हजारांच्या आसपास कोरोना बाधित आढळून येत होते. मात्र, सोमवारी नवीन कोरोना बाधित रुग्णांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. काल दिवसभरात देशात ९८७५ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर ७ हजार २५४ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर १७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या (active corona cases) ७७ हजारांवर गेली आहे. देशात केरळ (Keral) राज्यात सर्वाधिक म्हणजे २७८६ कोरोना बाधित आढळून आले आहे. तर त्याखालोखाल महाराष्ट्रात (Maharashtra) २३५४ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या २४ हजार ६१३ इतकी झाली आहे. तर २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.