पोटच्या पोराचा गळा चिरून खून..!

क्रूरतेचा कळस गाठणारी घटना मालाडमध्ये घडली आहे. आपल्याच पोटच्या पोराचा चाकूने निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मालाड पश्चिम येथील मालवणी परिसरात ही धक्कदायक घटना घडली. घटनेने खळबळ उडाली असून चिमुकल्याच्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी मालवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. नंदन अधिकारी असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळीच्या सुमारास नंदन अधिकारीची पत्नी आपल्या 13 वर्षाच्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेली. मात्र, जेव्हा ती घरी आली तेव्हा तिला घराच्या फरशीवर मुलाचा (वय. ५) मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. तिने मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर शेजाऱ्यांनी तिच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर या घटनेची माहिती मालवणी पोलिसांना दिली. दरम्यान या प्रकरणी मालाडच्या मालवणी पोलिस ठाण्यात आरोप विरोधात ३०२ भादवी कलमांतर्गग गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

पत्नीसोबत झालेल्या भांडणाच्या रंगात नंदन अधिकारीने आपल्याच पोटच्या ५ वर्षीय चिमुकल्याची हत्या केली. मुलाची हत्या केल्यानंतर नंदन स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्याची कबूली दिली.

दोघा पती पत्नीमध्ये अनेकदा वाद होत होत असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. पत्नीसोबत झालेल्या भांडणाच्या रंगात मुलाची हत्या केली. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटना अतिशय थरकाप उडवणारी होती. आपल्या पोटाच्या पोरावर चाकू चालवताना बापाचे हात कापले नाहीत.

दरम्यान, घटना अतिशय गंभीर असून याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस आणखी तपास करत आहेत.