वर्षभर ऑनलाइन शिकवल आता परीक्षा ऑफलाइन कशी?

नाशिक । प्रतिनिधी
दहावी आणि बारावीच्या (10th and 12th Board exams) ऑफलाईन परीक्षांना (Offline Exams) विद्यार्थ्यांकडून विरोध होताना दिसत आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन (Online Exam) घेण्यात याव्यात या मागणीसाठी, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या निवासस्थानाबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे.

राज्यात बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च दरम्यान तर, दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान होणार आहे. या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आता मंडळाच्या या निर्णयाविरुद्ध राज्यभरात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षांना विरोध केला आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात या मागणीसाठी, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या निवासस्थानाबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. तसेच पुणे (Pune), नागपूर (Nagpur) आणि अकोल्यासह काही ठिकाणी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झाले आहे.

दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून विदयार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरु असून दोन वेळा ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या. मात्र आता ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरवात केली आहे. यामध्ये ऑफलाईन परीक्षा रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. वर्षभर ऑनलाइन शिकवलं, तर मग परीक्षाही ऑनलाईन घ्या. तुम्ही वर्षभर ऑनलाइन शिकवता आणि ऑफलाइन परीक्षा घेता, हे योग्य नाही. त्यामुळे परीक्षा रद्द करा, अशी मागणी आंदोलक विदयार्थ्यांनी केली आहे.