यंदाचे वर्ष खूप खास असून देशाच्या कान्या-कोपर्यात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. यानिमित्ताने बिडकीन शाळेतील मुलांकडून देशाला एक अनोखी सलामी दिली आहे. त्यांनी स्वतः ३७५ मीटरचा ध्वज तयार करत रॅली काढली, आणि देशाला अनोखी सलामी दिली आहे.
यंदा देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. या निमित्त देशात विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. ‘ आझादी का अमृत महोत्सव ‘ अभियानांतर्गत देशभरात तिरंगा रॅली काढण्यात येत आहेत. स्वातंत्र्य सप्ताहाचा एक भाग म्हणून १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरात तिरंगा लावण्यात येणार आहे. अनेक शाळांमध्ये सुद्धा विद्यार्थी तिरंगा रॅली काढताना पाहायला मिळत आहे.
अश्यातच, औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन शहरात एक आगळी-वेगळी तिरंगा रॅली काढण्यात आली. पैठण तालुक्यातील बिडकीन येथील किलबिल प्राथमिक शाळा व एचपीएल विद्यालयातर्फे ३७५ मीटरचा ध्वज तयार करत रॅली काढण्यात आली. यावेळी औरंगाबाद – पैठण रोडवरून ही तिरंगा रॅली काढण्यात आली.
देशात सगळ्याच स्तरांतून देशाचे ‘स्वातंत्र्या अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर विविध उपक्रम राबविले जात आहेत. संपूर्ण देश ‘ हर घर तिरंगा ‘ मोहिमेला साथ देत आहे. त्यात महावितरणही मागे नाही. महावितरणाने तर ऑगस्ट महिन्यातील सर्व वीजबिलांवर ‘ हर घर तिरंगा’ चे स्टीकर्स चिकटवून प्रत्येक घरात तिरंगा पोहोचविला जाणार आहे.