नाशिक : ऑफीस सुरु करण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये सांगत मानसिक आणि शाररिक छळ करून उपाशी ठेवत विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पती आणि सासूच्या विरोधात नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहिती आणि फिर्यादी यांच्या फिर्यादीनुसार श्रद्धा हीचा विवाह धनंजय धनगर याच्यासोबत झाला होता,हल्ली संशयित पती आणि त्याची आई हे कल्याणी नगर,जळगाव येथे राहत आहे .गेल्या काही दिवसांपासून संशयित पती धनंजय धनगर आणि सासू संगिता संतोष धनगर हे श्रद्धा नवीन ऑफिस विकत घेण्यासाठी माहेरहून वीस लाख रुपये घेऊन ये, असे सांगून तिचा सासरी शाररिक आणि मानसिक छळ करून तिला उपाशी ठेऊन ,शिवीगाळ व मारहाण करून वॉट्सअप वरील संभाषणाची हास्य इमोजी पाठवून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून नाशिकच्या म्हसरूळ पोलिसांत ६८/२०२२,भादंवि कलम ३०६ ,४९८(अ),३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर म्हसरूळ पोलीस ठाणे अंतर्गत या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.