ओबीसी आरक्षणासंदर्भातली सुप्रीम कोर्टातील सुनावणी उद्यावर

नाशिक । प्रतिनिधी

ओबीसी आरक्षणासंदर्भातली सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलली असून उद्या दुपारी दोन वाजता होणार आहे. सोमवारी कामकाजाच्या यादीनुसार वेळेत काम पूर्ण होऊ न शकल्याने आता उद्या सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या याचिका कोर्ट एकत्रित ऐकणार आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे २७ टक्के आरक्षण स्थगित केले. आगामी वर्षभरात महाराष्ट्रातल्या जवळपास २३ महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुका असणार आहेत. ह्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसारख्या मेट्रो शहरांच्या पालिकांचाही समावेश आहे. ह्या सगळ्या संस्थांमधल्या ओबीसी आरक्षणावर गंडांतर आले.

मा. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव २७ टक्के जागांवर निवडणूक घेण्यास पुढील निर्णयापर्यंत स्थगिती दिली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार होती. यात राजकीय सरकार आपली बाजू मांडणार होते. सोमवारी कामकाजाच्या यादीनुसार वेळेत काम पूर्ण होऊ न शकल्याने आता उद्या सुनावणी होणार आहे. त्यामूळॆ आजची सुनावणी उद्यावर ढकलण्यात आली आहे.

दरम्यान सुप्रीम कोर्टाचा निर्णय कायम राहिला तर सत्तेची सगळी समीकरणे बदलू शकतात. राज्य सरकारला याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. यासाठी छगन भुजबळ सात्यत्यानेप्रयत्न करताना दिसत आहेत. समता परिषदेच्यावतीनं डीएमकेचे खासदार आणि ज्येष्ठ वकिल पी विल्सन यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. तर गोंदियातील एका ओबीसी उमेदवाराच्या वतीने ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल यांनीही दाखल केली आहे. काही तांत्रिक बाबीमुळे ओबीसी आरक्षण स्थगित करुन संपूर्ण समाजाला वेठीस धरणे चुकीचे असल्याचे भूजबळ म्हणाले आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे लक्ष होते. मात्र आता हि सुनावणी उद्या होणार आहे.