सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यातील वाद सुप्रिया सुळेंनी मिटवला

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात सभागृहाबाहेर जोरदार खडाजंगी झाली हा वाद चालू असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यस्थी करत या दोघांमधील वाद मिटवला . आणि सोनिया गांधी यांना स्मृती इराणी यांच्यापासून घेऊन गेल्या


काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी भारतच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गुरुवारी संसदेत गोंधळ झाला. त्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. सभागृह तहकूब केल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यात सभागृहाबाहेर जोरदार शाब्दिक वाद झाला .

लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर भाजप खासदारांनी ‘सोनिया गांधी माफी मागा ‘च्या घोषणा दिल्या . 12 वाजता सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू होताच ही घोषणाबाजी करण्यात आली. गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज तहकूब झालं. त्यानंतर सोनिया गांधी यांनी घोषणाबाजीतच भाजप खासदार रमा देवी यांच्याकडे अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितल्याचं सांगण्यासाठी आल्या या वेळी रमा देवी यांच्याजवळ उभ्या असलेल्या स्मृती इराणी यांनी सोनिया गांधी यांना उद्देशून वक्तव्य केलं.


यावेळी सोनिया गांधी यांनी त्यांनी स्मृती इराणी यांना तूम्ही माझ्याशी बोलू नका ( Don’t Talk to Me) असं सांगितलं. यावरुन स्मृती इराणी आणि सोनिया गांधी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. 2 ते 3 मिनिटं हा वाद सुरु होता. या वेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला आणि सोनिया गांधी यांना त्या जागेवरून घेऊन गेल्या.