नाशिक : नाशिक जिल्ह्यातील (Nashik distirct) त्र्यंबकेश्वर (Tryambakeshwar) मंदिरात पिंडीत बर्फ जमा झाल्याचा दावा मंदिरातील पुजाऱ्याने केला आहे. या मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. काही नागरिकांच्या दाव्यानुसार भारत चीन युद्धानंतर १९६२ मध्ये ही असाच बर्फ जमा झाल्याची नोंद आहे. पण काही जण या घटनेला विरोधही करतात. मंदिर प्रशासन या त्र्यंबकेश्वर मंदिरातील सीसीटीव्हीची तपासणी करून अधिकृत माहिती देणार आहे.
त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाची देशातील बारा ज्योतिर्लिंगपैकी आद्य ज्योतिर्लिंग म्हणून देशभरात मान्यता आहे. येथील मंदिरात पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा दावा पुजाऱ्याने केला आहे. या मंदिरातील सीसीटीव्हीची तपासणी करून अधिकृत माहिती मंदिर प्रशासन देणार आहे. दरम्यान, या घटनेबाबत येथील नागरिकांमध्ये चर्चा रंगल्या आहे. मंदिर प्रशासन या घटनेबाबत चौकशी करून अधिकृत माहिती देणार आहे.