नाशिक : महाराष्ट्र बँक अपरातपर प्रकरणातील संशयीतास पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे . नाशिकच्या देवळा तालुक्यातील भूऊर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेमध्ये केलेल्या अपहर प्रकरणातील संशयित आरोपी भगवान आहेर यास कळवण न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणात अजून कोणाचा सहभाग आहे अपहार झालेला पैसा नेमका गेला कुठे अशा अनेक गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता आहे. बँकेसमोर ग्राहकांनि तक्रारीसाठी रांगा लावल्या आहेत.
सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा हा प्रकार समोर आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्ष्यात घेत अवघ्या काही तासातच देवळा पोलिसांनी आरोपीच्या मुस्क्या आवळल्या आहेत . नाशिक आग्रा महामार्गावर असलेल्या सोग्रस फाटा येथून त्याला अटक करण्यात आली होती . त्यांतर देवळा पोलिसांनी कळवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हा दीड कोटी रुपयांचा अपहार दिसत असला तरी तक्रारदारांची रीघ बँकेसमोर कायम असल्याने अजून हा आकडा वाढण्हेयाची शक्यता आहे . इतक्या मोठ्या अपहरत नेमका कुणाकुणाचा सहभाग आहे. किंव्हा या मध्ये आणखी अजून कुणाचा सहभाग आहे. आता तेखील पोलीस तपासात उघडकीस येणार कि काय त्याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.