Home » अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराप्रकरणी संशयितास न्यायालयीन कोठडी

अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराप्रकरणी संशयितास न्यायालयीन कोठडी

by नाशिक तक
0 comment

नाशिक : ज्ञानदीप आधार आश्रमातील (Gyandeep Aadhaar Ashram, Nashik) अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी आरोपी हर्षल मोरेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (14 days judicial custody to Harshal More) सुनावण्यात आली आहे. हर्षल मोरेवर ७ अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. गुरुवारी (दि.२४ नोव्हेंबर) हे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करत घटनेचा तपास सुरु केला. तपासात मोरे याने ७ मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून आरोपी हर्षल मोरेवर पोक्सो आणि आट्रोसिटीचा गुन्हा म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल आहे.

ज्ञानदीप गुरुकुल आश्रमात ७ मुलींचे लैंगिक शोषण (7 girls raped in Aadhaar Ashram Nashik) केल्याच्या आरोपात अटकेत असलेल्या संशयित संचालक हर्षल मोरे याला आज म्हसरूळ पोलिसांकडून जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दुसऱ्यांदा सुनावलेली ७ दिवसांची पोलीस कोठडीची मुदत आज पूर्ण झाली. दरम्यान आज न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्या विरुद्ध पाॅस्को, विनयभंग, बलात्कार, ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत ७ गुन्हे दाखल आहेत. ७ मुलींवर केलेल्या अत्याचारांपैकी ६ मुली अल्पवयीन असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्याच्यावर पॉस्को (Posco) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

पहिल्या गुन्ह्यात मोरेला तिसऱ्यांदा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमात अल्पवयीन १३ मुलींचा विनयभंग आणि ७ मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे पिडीत मुलींनी दिलेल्या जबाबदातून समोर आलं आहे. या घटनेनंतर म्हसरूळ पोलिसांनी संशयित हर्षल मोरे याला बेड्या ठोकल्या होत्या. त्याला आतापर्यंत न्यायालयाने सलग दोनदा सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. गुन्ह्याची गंभीरता बघता पोलिसांनी अधिक सखोल तपास करण्यासाठी वाढीव पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे मागील सुनावणीत केली होती. या सुनावनीतही पोलिसांकडून मोरेच्या सखोल चौकशीसाठी वाढीव पोलीस कोठडीची मागणीची शक्यता वर्तवण्यात आली होती.

२०१८ ते २०२२ या कालावधीत अल्पवयीन आणि सज्ञान अशा एकूण ७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मोरे पोलिसांच्या कोठडीत होता. पोलीस आयुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त दिपाली खन्ना यांनी मागील १४ दिवसात या प्रकरणाचा कसून तपास करत पुरावे आज न्यायालयात सादर केले होते. दरम्यान या घटनेने नाशिक शहरासह जिल्हा देखील हादरला होता.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!