नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ जण ठार झाले आहे. इगतपुरी च्या पंढरपूरवाडीत भरधाव आयशरने पुढे चालणाऱ्या मोटारसायकल व बैलगाडीस जोरदार धडक दिली. यात तीन जण जागीच ठार झाले तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे. अपघाताचे सत्र सुरु असतना मंगळवारी (दि. १०) अपघाताची पुन्हा एक भीषण घटना समोर आली आहे.
दरम्यान या अपघातात मयत झालेले तिघेजण हे इगतपुरी (Igatpuri Accident) तालुक्यातील बोरटेंभे (Bortenbhe Igatpuri, Nashik) येथील रहिवासी आहे. त्यांच्या मृत्यूमुळे या गावावर शोककळा पसरली आहे. काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी व नागरिकांनी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी केली होती. या अपघातानंतर आयशर चालक फरार झाला असून पोलिसांनी आयशर ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
-मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात
-अपघातात ३ जण ठार तर एक किरकोळ जखमी
-इगतपुरी च्या पंढरपूरवाडी समोर घडला अपघात
-भरधाव आयशरने पुढे चालणाऱ्या मोटारसायकल व बैलगाडीस दिली जोरदार धडक
-मयत झालेले तिघेजण हे इगतपुरी तालुक्यातील बोरटेंभे येथील रहिवासी
मुंबई- नाशिक महामार्गावरील पंंढरपुरवाडी भागात रात्री १० वाजेच्या सुमारास घाटनदेवी येथून बोरटेंभेकडे जाण्याऱ्या टांग्याला आणि दुचाकीला भरधाव आयशरने जोरदार धडक दिली. या अपघातात बोरटेंभे येथील प्रभाकर सुधाकर आडोळे (वय, २५), कुशल सुधाकर आडोळे (वय, २२) व रोहीत भगीरथ ओडोळे (वय. १९) हे जागीच ठार झाले आहे.
मंगळवारी (दि. १०) रात्री इगतपुरी जवळ हा भीषण अपघात (accident on Mumbai-Nashik highway) झाला होता. या अपघातात ३ युवक ठार झाल्याची दुखद घटना घडलेली असताना या घटनेला रात्र उलटत नाही तोच पुन्हा एका अपघाताची घटना समोर आली. पोलिसांच्या वाहनाच्या अपघाताची घटना इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील लिअर कंपनीजवळ घडली असून कालचा अपघात इगतपुरी च्या पंढरपूरवाडी समोर झाला होता. इगतपुरी ते नाशिक दरम्यान रोज घडणाऱ्या या लहान मोठ्या अपघातांमुळे मात्र चिंता व्यक्त केली जात आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात अपघातांच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्ष देखील नाशिक शहर आणि जिल्हा भीषण अपघाताचे साक्ष राहिला आहे. दरम्यान या वर्षीही पहिल्या दिवसापासून वारंवार अपघातांच्या घटना घडत आहे. अनेक घटनांमध्ये जीवितहानी देखील झाली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर झालेल्या या अपघातात तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे गाव आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.