मनमाड : धावत्या नांदेड-कुर्ला हॉलिडे एक्सप्रेस (०७४२८) च्या (Nanded-Kurla Holiday Express) S3 आणि S4 बोगीच्या ब्रेक लायनरला आग लागून मोठ्या प्रमाणात धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये धावपळ उडाली होती. मोठ्या प्रमाणात धूर पाहून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रवाशांनी आपली जागा सोडत बाहेर निघायला सुरुवात केली होती. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
लासलगाव-उगाव (Lasalgaon-Ugaon) दरम्यान ही घटना घडली. अचानक धूर निघायला सुरुवात झाल्याने एकाच गोंधळ उडाला. धूर मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे प्रवाशी घाबरून गेले. दरम्यान गाडी उगाव स्टेशनला (Ugaw Station) काही काळ थांबविण्यात आली होती. प्रवाश्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. नाशिक-मनमाड नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. यामुळे सुमारे २० मिनिटानंतर गाडी नाशिकच्या दिशेने रवाना झाली.
पहा व्हिडीओ :
सणवार जवळ आल्यामुळे सध्या लोक आपल्या गावी निघाले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. अशात एक मोठी दुर्घटना टळली आहे. धूर निघत असल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे गाडी उगाव स्टेशनला काही काळ थांबविण्यात आली होती. प्रवाश्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. नाशिक-मनमाड नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.
अचानक लागलेल्या आगीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे गाडीला स्टेशनवर थांबवण्यात आले. प्रवाश्यांच्या सतर्कतेमुळे आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे पुढील अनर्थ टळला. नाहीतर भंयकर प्रकार घडू शकला असता. सुदैवानं अशी कोणतीही दुर्घटना घडली नाही. आग वेळीच नियंत्रणात आली. त्यामुळे मोठा अपघात टळला.
धावत्या नांदेड-कुर्ला हॉलिडे एक्सप्रेस (०७४२८) च्या S3 आणि S4 बोगीच्या ब्रेक लायनरला आग (Nanded-Kurla Holiday Express catches fire) लागून मोठ्या प्रणामत धूर निघायला सुरुवात झाली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये धावपळ उडाली. मोठ्या प्रमाणात धूर पाहून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. महिला प्रवाशांनी तर आरडाओरडा करण्यास सुरुवात केली होती. तर काही प्रवाशांनी आपली जागा सोडत बाहेर निघायला सुरुवात केली होती. दरम्यान एका प्रवाशाने तातडीने साखळी ओढून उगाव रेल्वे स्थानकावर गाडी थांबवल्या नंतर तेथील रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अगीवर नियंत्रण मिळवले आणि पुढील अनर्थ टळला. यामुळे सुमारे २० मिनिटानंतर गाडी नाशिकच्या दिशेने रवाना झाली.