नाशिक आणि बिबट्या (Nashik Leopard) हे समीकरण नाशिककरांसाठी काही जुने नाही. मात्र झाडावर खेळ खेळताना बिबटे (Leopard on a tree) दिसणं ही नाशिककरांसाठी नक्कीच नवं आहे. सिन्नरमधील सांगवी (Sangvi, Sinner) परिसरात काही दिवसांपूर्वीच दोन बिबटे झाडावर खेळतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. दरम्यान आता पुन्हा एकदा निलगिरीच्या झाडावर बिबट्या (Leopard on eucalyptus tree) चढल्याचा व्हिडिओ समोर येत आहे आणि हा सिन्नरच्या सांगवीमधीलच असल्याचा दावा केला जात आहे. सांगवीमधून समोर आलेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये बिबट्या नारळाच्या झाडावर (Leopard on a coconut tree) चढला होता. तर आता निलगिरीच्या झाडावर त्या चढला असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान हा देखील व्हिडिओ सिन्नरच्या सांगवी येथील असल्याचं म्हटलं जात आहे.

रस्त्यावरही बिबट्याचा मुक्त वावर..बिबट्याच्या दहशतीत सांगवी परिसर
एक दिवस आधीच सिन्नरच्या सांगवी परिसरात रात्री रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार (Free movement of leopards on roads at night in Sangvi area of Sinnar) देखील पाहायला मिळाला होता आणि त्याआधी बिबट्यांचा झाडावरील खेळ खेळतानाचा व्हिडिओ देखील समोर आला होता. रस्त्यावर जात असताना चारचाकी वाहन चालकाला बिबट्याचा हा मुक्त संचार दिसून आला होता. तेव्हा गाडीतूनच वाहन चालकाने बिबट्याचा मानवी वस्तीतील सर्रासपणे सुरू असलेला संचार कॅमेरा मध्ये कैद केला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर बिबट्याचे पुन्हा पुन्हा या परिसरात दर्शन होणे नागरिकांसाठी धोक्याचे आहे. त्यामुळे कुठेतरी नागरिकांच्या मनात भीती पसरली आहे.
काही दिवसांपूर्वी बिबट्यांचा नारळाच्या झाडावर धुमाकूळ
सिन्नर येथे काही दिवसांपूर्वीच बिबट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला होता. दोन बिबटे नारळाच्या झाडावर चढून खेळत होते. हे दृश्य नागरिकांनी कॅमेरात कैद केली असून नारळाच्या झाडांवर बिबट्यांचा खेळ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. नारळाच्या झाडांवर बिबटे खेळताना पाहून नागरिकांना त्यावेळी कुतूहल जरी वाटत असलं तरी मनात कुठेतरी भीती देखील होती. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावला होता. त्यानंतर पुन्हा रस्त्यावर अगदी मुक्तपणे बिबट्याचा संचार दिसल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे. अशात निलगिरीच्या झाडावर चढलेल्या या बिबट्याचा व्हिडिओ याच परिसरातील असल्याचा सांगितलं जात असल्याने या परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असल्याचं म्हटलं जात आहे.
पहा व्हिडियो..