राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या बद्दल केलेल्या विधानाबद्दल भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज नाशिक शहरातील रविवार कारंजा येथे त्यांच्या वक्तव्याविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच अजित पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
अजित पवार हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असतात. तसेच ते हिंदू धर्मद्रोही आणि शिवद्रोही असल्याचा आरोप करत, त्यांनी तातडीने विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
२०२२ हे वर्ष अनेक गोष्टींनी गाजलं आणि त्यात महापुरुषांबद्दल केलेली वादग्रस्त वक्तव्ये, त्या वक्तव्यांच्या विरोधात झालेले निदर्शने, राजकारण महाराष्ट्राने जवळून पाहिले. दरम्यान वर्षाच्या शेवटाला या यादीत छत्रपती संभाजी राजे यांचेही नाव शामिल झाले आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात भाजप आक्रमक
-शहरातील रविवार कारंजा येथे भाजपचे आंदोलन
-कार्यकर्त्यांची अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी
-अजित पवार यांनी छ्त्रपती संभाजीराजे यांच्या विषयी केले होते वक्तव्य
-अजित पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
-अजित पवार यांनी तातडीने राजीनामा देण्याची मागणी
‘आपण छत्रपती संभाजी महाराज (Chatrapati Sanbhaji Maharaj) यांचा उल्लेख स्वराज्य रक्षक असा करतो. मात्र, त्यांना काही लोक धर्मवीर म्हणत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी कधीही धर्मावरुन राज्य केलं नाही.’ असे भाष्य अधिवेशनात अजित पवारांनी केले. या विधानावर आक्षेप घेत त्यांनी धर्मवीर संभाजी महाराज यांचा अपमान केला त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेत्याच्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप कडून करण्यात येत आहे.
काय म्हणाले होते अजित पवार ?
अधिवेशनात महापुरुषांच्या अवमानाबद्दल अजित पवार बोलत होते ‘महापुरुषांच्या अवमानाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकही शब्द काढला नाही. अस ते म्हणाले. यावेळी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरुन अजित पवार यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. आपण छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्य रक्षक असा करतो. मात्र, त्यांना काही लोक धर्मवीर म्हणत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी कधीही धर्मावरुन राज्य केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचही हिंदवी स्वराज्य होतं. असं भास्य त्यांनी केले होते. त्यामुळे आता नवा वादांग निर्माण झाला आहे.