नाशिकच्या (Nashik) लाचलूपचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई सुरूच असून आताच्या एका कारवाईत लाचलूपचपत प्रतिबंधक विभागाने सेंट्रल किचन बिल मंजुरीसाठी २८ लाख रुपयांची लाच घेताना आदिवासी विभागाच्या बड्या अधिकाऱ्याला अटक केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सेंट्रल किचन बिल मंजुरीसाठी आदिवासी विभागाच्या या बड्या अधिकाऱ्याने लाच मागितली असल्याची माहिती आहे. आदिवासी विभागातील एका मोठ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह जिल्ह्यातील लाचेच्या प्रकरणांत वाढ झाली आहे. दर आठवड्यात लाच मागण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. त्यातच नाशिकच्या आदिवासी विभागाच्या मोठ्या अधिकाऱ्यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. सेंट्रल किचन बिल मंजूर करण्यासाठी आदिवासी विभागाच्या या अधिकाऱ्याला तब्बल २८ लाख रुपयांची लाओ स्विकारताना पकडण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांत नाशिकच्या विविध विभागातील लाच प्रकारणे समोर येत असून यामध्ये अनेक बड्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याच निदर्शनास आले आहे. तर या प्रकरणामुळे आदिवासी विभागात खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणात या अधिकाऱ्यासोबत आणखी कोणी अधिकारी सहभागी आहे का? याचा तपास लाच लुचपत विभागाच्या पथकाकडून केला जात आहे. दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी वा कर्मचाऱ्याने किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीकडून कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.