नाशिक : शहरा मध्ये भविष्यात येऊ घातलेल्या अनेक व्यवसाय संधी आणि उद्योग संधीमुळे रियल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचा हा योग्य काळ आहे. त्यासाठी नाशिक क्रेडाई मेट्रोच्या शेल्टर २०२२ या ग्रह प्रदर्शनात ही परिस्थिती अनुभवायला मिळते. उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात गृहप्रदर्शनात क्रीडांग शेल्टर २०२२ च्या या प्रदर्शनात १५००० हून अधिक नागरीकांनी भेट दिलीये आणि त्यांच्या स्वप्नातील घरांचा शोध घेतलाय. एवढेच नाही तर शेल्टर २०२२ प्रदर्शन सुरू झाल्यापासून दोन दिवसात तब्बल ८० जणांनी प्रत्यक्ष फ्लॅट्सची नोंदणी देखील केली आहे. दरम्यान आज आणि उद्या सुट्ट्यांचा औचित्य साधून अनेकांनी साईट विजिटचं नियोजन देखील केल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

बांधकाम उद्योगास देशाच्या जीडीपीमध्ये महत्त्वाचं स्थान आहे एवढेच नाही तर शहरातील अर्थचक्र फिरवण्यामध्ये देखील बांधकाम उद्योगाचा मोलाचा वाटा असतो. रोजगाराच्या संधी या व्यवसायातून उपलब्ध होतात. त्यामुळे १००हून अधिक बिल्डर यांचे ५०० हुन अधिक प्रकल्प शेल्टर २०२२ च्या निमित्ताने एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले आहे. या प्रदर्शनामुळे नक्कीच शहराचे अर्थचक्र फिरवण्यास गती मिळेल असा विश्वास प्रदर्शनाचे समन्वयक कृणाल पाटील यांनी व्यक्त केला आहे.
घरांशिवाय बांधकाम साहित्य इंटेरियर लागणारे विविध साहित्य तसेच इतर संबंधित व्यवसाय आघाडीच्या गृह कर्ज देणाऱ्या संस्था आणि बँकेचे स्टॉल्स देखील येथे उपलब्ध आहेत. प्रदर्शनास भेट देण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केल्यास मोफत प्रवेश देण्याचे क्रेडाईने यापूर्वीच जाहीर केले होते. यासाठी फक्त क्यू आर कोड स्कॅन करून आपली माहिती भरल्यास एन्ट्री पास त्या दर्शकाच्या मेल वर येईल. या ऑनलाइन नोंदणीची मुदत आता २८ नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे.
नाशिक हे एक शैक्षणिक हबकडे वाटचाल करणारे शहर आहे. शहरात अनेक संधी उपलब्ध आहेत. सामाजिक आणि सांस्कृतिक समरसता तसेच आर्थिक समतोल यामुळे नाशिक हे देशातील जगभरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेण्यासाठी पसंतीचे ठिकाण बनत चाललेय असं सर्वेक्षणात देखील समोर आलेय. क्रेडायच्या पाहणीतील निष्कर्षानुसार हवामान, मुबलक पाणी, भारतातील आघाडीच्या शहरांपेक्षा कमी प्रदूषण पातळी, सुंदर निसर्ग लँडस्केप आणि परवडणारे राहणीमान यामुळे भारतातील राहण्या योग्य शहर नाशिक आहे. त्यामुळे नाशिकमध्ये रियल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचा हाच खरा योग्य काळ असून आपली स्वप्नातील घर खरेदी करणाऱ्यांसाठी हीच योग्य संधी असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.