नाशिक : मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील खोडे नगर येथे किराणा घेऊन घरी जात असलेल्या महालेंच्या गळ्यातील मंगळसूत्र काळ्या रंगाच्या मोटर सायकल वरून आलेल्या हेल्मेट परिधान केलेल्या दोघा चोरट्यांनी ओढून नेले आहे.याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहिती नुसार नीलिमा अविनाश कुलकर्णी ह्या आपल्या सुनेसोबत खोडेगर इथल्या प्रथम अपार्टमेंट येथून पाणी जात असताना समोरून काळ्या रंगाच्या मोटार सायकल वरून दोघे जण आले आणि या मोटार सायकलवर मागे बसलेल्या इसमाने काही क्षणात नीलिमा कुलकर्णी यांच्या गळ्यातील ३७ ग्रॅम वजनाचे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचले आणि वेगाने मोटार सायकल पळवून पसार झाले.यामुळे पुन्हा एकदा महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांत भा द वि कलम ३९२ ,४३ प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक के टी रौंदळ याबाबत अधिक तपास करत आहे.