नाशिक : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(uddhav thackray) यांच्या समर्थनार्थ आज चांदवड शिवसेनेच्या(shivsena) वतीने चांदवड येथील मुंबई आग्रा महामार्ग येथे रास्ता रोको करण्यात आला होता यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक या रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते.तर काहीकाळ मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक खोल्मबाळी होती.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे कृषी मंत्री दादा भुसे ,आमदार सुहास आण्णा कांदे, व बाकी सर्व बंडखोर आमदारांच्या विरोधात आज चांदवड येथील मुंबई आग्रा महामार्ग येथे रास्ता रोको दरम्यान तुफान घोषणाबाजी करण्यात आली होती.यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन आहेर माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाशिक जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक शिवसेने बरोबर असून नाशिक जिल्ह्यातील बंडखोर व गद्दार आमदार जे गेले ते फक्त आमदार आहेत मात्र शिवसैनिक आजही शिवसेनेचेच आहेत असे सांगून येणाऱ्या काळात गद्दारांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय शिवसैनिक शांत राहणार नाही असे मत व्यक्त करत बंडखोर आमदारांनी विरुद्ध निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला.
येणाऱ्या काळात शिवसैनिक बंडखोरी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही व नाशिक जिल्ह्यातील बंडखोरी करणाऱ्या आमदारांना येणाऱ्या काळात शिवसैनिक त्यांना त्यांची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही शिवसेनेने दादा भुसे यांना मंत्रीपद दिले सुहास आण्णा कांदे यांना भरघोस निधी देत काही कमी केले नाही तरीही यांनी शिवसेनेशी बंडखोरी केल्यामुळे त्यांचा तीव्र शब्दात निषेध करत अजूनही वेळ गेलेली नाहीये नाशिक जिल्ह्यातील बंडखोर आमदारांनी शिवसेनेचे परत या असे आवाहन यावेळी करण्यात आले. आंदोलनावेळी नाशिक जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील पाटील ,माजी जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, उपजिल्हाप्रमुख नितीन आहेर ,चांदवड तालुका शिवसेनाप्रमुख विलास भवर ,अर्चनाताई पुरकर, केशव ठाकरे ,संदीप उगले ,कविता ताई धाक राव,आदी उपस्थित होते.