नाशिक: पोलीस पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काल झालेल्या पंचवटी परिसरातील खून प्रकरणातील आरोपीला अवघ्या तीन तासात पकडण्याची कर्तव्य दक्ष कामगिरी केली आहे. शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असून शहर पोलिसांच्या या सतर्कतेमुळे या गुन्हेगारांमध्ये एका प्रकारे वचक निर्माण होतो, पोलिसांच्या या कामगिरीचे कौतक केले जात आहे.
शनिवारी खुनाचा थरार
शनिवारी ( दि. १० ) पंचवटी परिसरात रवी सलीम सय्यद ( वय. २०) हा तरुण रस्त्याने घरी पायी जात होता, त्यावेळी संशयित आरोपी किरण कोकाटे याने रिक्षाने पाठीमागून आला व त्याच्या हातातील धारदार शास्त्राने रवी याच्या पाठीमागे खुपसून फरार झाला. दरम्यान रवी याचा यात मृत्यू झाला.
वैमनस्यातून खून
ही घटना वैमनस्यातून झाली असून, आरोपीचा आणि मृत तरुणाचा वाद होता त्याचा वचपा काढण्यासाठी आरोपीने हा खून घडवून आणला असून यात रवी सलीम सय्यद याचा खून झाला आहे. घटनेने संपूर्ण नाशकात खळबळ उडाली असून शहरात पुन्हा एकदा खून झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अवघ्या ३ तासांत आरोपी पोलिसांच्या तावडीत
घटना अतिशय खळबळजनक होती त्या अनुषंगाने मा डॉ . बि . जी . शेखर पाटिल सो , विशेष पोलीस महानिरिक्षक , अतिरिक्त पोलीस आयुक्त अमोल तांबे , संजय बारकुंड पोलीस उप आयुक्त, गंगाधर सोनवणे , सहा. पोलीस आयुक्त यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवुन आरोपीताचा शोध घेवुन त्यांना तात्काळ अटक करणेबाबत मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या. तसेच सदर गुन्हयाचे घटनास्थळी वपोनि , विजय ढमाळ, वपोनि आंचल मुदगल यांनी भेट दिली.
त्यानुसार अमोल तांबे , डॉ . सिताराम कोल्हे, युवराज पतकि, रणजित नलवडे , पोलीस निरिक्षक ( प्रशासन ) यांचे मार्गदर्शनाखाली पंचवटी विभागातील पंचवटी , म्हसरूळ , आडगाव येथील गुन्हे शोध पथकाच्या वेगवेगळ्या तीन टिम बनवुन आरोपी किरण रमेश कोकाटे याचा शोध पथके तयार करून रवाना करण्यात आली होती. त्याप्रमाणे पंचवटी ठाणेचे गुन्हे शोध पथकाने तांत्रिक व मानवी कौशल्याचा वापर करून आरोपी किरण रमेश कोकाटे यास सिडको, अंबड, नाशिक येथुन ताब्यात घेतले.