नाशिक : देवळाली गाव गांधी पुतळा परिसरात शिंदे गट आणि ठाकरे गटात तुफान राडा झाला आणि गोळीबारही करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून आता या प्रकरणावर नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय पक्षांनी इथपर्यंत जाऊ नये आणि पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
नाशिकमध्ये शिंदे-ठाकरे गटात आधी शाब्दिक बाचाबाची झाली त्यानंतर थेट गोळीबार झाला. यावर बोलताना ‘राजकीय पक्षांनी इथपर्यंत जाऊ नये. दरम्यान आता पोलिसांनी कठोर कारवाई करावी. मी पालकमंत्री असताना अस घडल तर अनेक जण ओरडत होते ते मात्र आता ते लोक बोलतही नाहीये. पोलिसांनी कुणाच्याही दबावला बळी न पडता कारवाई करावी’ अशी मागणी छगन भुजबळांनी केली.
राज्यभरात शिंदे गट विरुध्द ठाकरे गट अशी परिस्थिती आहे. दरम्यान स्थानिक पातळीवर देखील एका पक्षात निर्माण झालेली ही दरी आणि त्यानंतर शिवसेनेची विभागणी होऊन सुरु झालेल्या गटबाजीचे परिणाम दिसून येत आहे. नाशिकमध्ये १ दिवस आधी शिंदे गट आणि ठाकरे गटात तुफान राडा झाला,,गोळीबारी झाली आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. उपनगर पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासाअंती शिंदे गटाचे पदाधिकारी असलेल्या सूर्यकांत लवटेंचा मुलगा स्वप्नील याने बंदूक काढत हवेत गोळीबार केल्याची माहिती समोर आली. दरम्यान आता पोलिसांनी कुणाच्याही दबावला बळी न पडता कारवाई करावी, अशी मागणी भुजबळ करत आहे.
दरवर्षीप्रमाणे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती आणि त्याच वेळी शिंदे गट आणि ठाकरे गटात शाब्दिक चकमक झाली आणि त्याचे पर्यावसन थेट हाणामारीत झाले. पोलिसांचं मोठा फौजफाटा देवळाली गाव परिसरात दाखल झाला होता. दरम्यान आधीच नाशिक शहरात गुन्हेगारी फोफावत चालली असताना राजकीय पक्षांकडून असे प्रकार घडत असतील तर हा चुकीचा संदेश जात असून राजकीय पक्षांनी इथपर्यंत जाऊ नये, असा सल्ला भुजबळांनी दिला आहे.
नाशिकमध्ये देवळाली गावात शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आले होते. यात गोळीबार देखील झाला. तपास केल्यानंतर शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या मुलाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली . देवळाली गाव परिसरात सायंकाळी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या समर्थकांमध्ये तुफान राडा होऊन शिंदे गटाचे पदाधिकारी असलेल्या सूर्यकांत लवटेंचा मुलगा स्वप्नील याने बंदूक काढत हवेत गोळीबार केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान भुजबळांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे आणि मी पालकमंत्री असताना अस घडल तर अनेक जण ओरडत होते ते मात्र आता ते लोक बोलतही नाहीये, असा टोला देखील लगावला आहे.