by : ऋतिक गणकवार
बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात पुन्हा एक जोरदार ठिणगी पडली असून हा वाद पुन्हा चिघळण्याची दाट शक्यता आहे. कडूंना कुठे गाठायचं ते मला माहित आहे, मी कडूंना घरात घुसून मारू शकतो, असाही जोरदार इशारा रवी राणा यांनी कडू यांना दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा कडू-राणा यांच्यातील वाद टोकाला जाण्याची दाट शक्यता असून वातावरण तापण्याची शक्यता आहे.
कालच मिटला होता वाद!
बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात वाद झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली होती. त्यानंतर दोघांनी वादावर कालच पडदा टाकला होता. कडू आणि राणा या दोघांनीही काल आमच्यातील वाद मिटल्याचे जाहीर केले होते.
रवी राणा यांच्यातील वाद आता पुन्हा चिघळणार
रवी राणा म्हणाले, ‘कुणी विनाकारण दम देऊन बोलत असेल, तर जशाच तसं उत्तर देऊ. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन मी मागे आलो. त्यांच्या मध्यस्थीमुळेच मी मागे शांत राहिलो. पण हा व्यक्ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शब्दाला मान देत नाही. बच्चू कडू हा विषय माझ्यासाठी छोटा आहे. कडूंना कुठे गाठायचं ते मला माहीत आहे’. ‘मी कडूंना घरात घुसून मारू शकतो, असाही जोरदार इशारा रवी राणा यांनी कडू यांना दिला आहे.
त्यामुळे बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद आता पुन्हा चिघळण्याची दाट शक्यता आहे. कालच दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासांगण्यावरून वादावर पडदा टाकला होता. आपल्या वक्तव्यांवर दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र आता तो वाद पुन्हा वाढण्याची चिन्ह दिसत आहेत.