Crime : थरकाप उडवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आफताब पूनावाला याने कोर्टात हत्येची कबुली दिली आहे(Aftab Poonawala’ who is in police custody in the Shraddha Walker murder case’ has confessed to the murder in the court). ‘श्रद्धाची हत्या मीच केली आहे’ असं त्याने कोर्टासमोर कबुल केलं आहे. मी रागाच्या भरात तिची हत्या केली असं देखील आफताब याने कोर्टासमोर सांगितलं आहे. श्रद्धा हत्याकांड प्रकरणात अटकेत असलेल्या आफताबला पोलिस कोठडी संपल्याने दिल्लीच्या साकेत कोर्टात व्हिडिओ कॉन्फरनसिंग द्वारे हजार करण्यात आलं होतं. आफताब ने कबुली दिल्यानंतर त्याच्या पोलिस कोठडीत अजून वाढ करण्यात आली आहे. त्याची पोलिस कोठडी अजून ४ दिवस वाढवण्यात आली आहे.

एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार आरोपी आफताब पूनावाला याने न्यायालयात सांगितलं की, ‘श्रद्धाची हत्या मीच केली आहे, मी रागाच्या भरात तिची हत्या केली. ही घटना क्षणार्धात घडली, मी तपासात सहकार्य करत आहे. मला घडलेली घटना नीट आठवत नाहीये.”
श्रद्धा हत्याकांड प्रकरणात आफताब एखाद्या प्रोफेशनल किलरप्रमाणे पोलिसांची सतत दिशाभूल करत असल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी त्यानं तीन करवतीच्या ब्लेडचा वापर केला होता. त्यानंतर ते ब्लेड डीएलएफ, गुरुग्राम येथील त्याच्या कार्यालयाजवळ फेकून दिले होते. अशी माहिती आफताब ने दिली होती. त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सलग दोन दिवस ब्लेड्सचा शोध घेतला. मात्र हाती काहीच आलं नाहीये. दरम्यान पोलिस पुन्हा त्या ठिकाणी आफताबला घेऊन तपास करणार असल्याची देखील माहिती आहे.
आफताबने याआधी श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी वापरलेले हत्यार जंगलात फेकले असल्याचं सांगितलं होतं. तिचं शीर कुठे फेकलं याबद्दलही त्याने अनेकदा आपला जबाब बदलला आहे. आफताबने दिल्ली पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार दिल्लीच्या एका तलावात त्याने श्रद्धाचे शिर फेकले होते. त्यानंतर सदर पूल रिकामा करण्याचे काम सुरु झाले. पाणबुड्यांना पाचारण करण्यात आले. मात्र अद्यापही तिचे शिर मिळून आले नाही.
तपास सीबीआयकडे :
या हत्याकांडांचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश मागणारी जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणाचे तीव्र पडसाद वसईत उमटले आहे. आफताबच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी देऊन नागरिकांनी त्याच्या पुतळ्याला चपलेने मारहाण केली आहे.