दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडापेक्षाही थरारक हत्याकांड झारखंडमध्ये घडले आहे. झारखंड मधून जी बातमी उघडकीस आली आहे ती श्रद्धा हत्याकांडाच्या एक पाऊल पुढे आहे. झारखंडच्या राची येथील साहेब गंज येथे एका पतीने पत्नीचा खून केला आणि कटरने तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. हाच प्रकार श्रद्धा वालकरच्या हत्याकांडात घडला होता. मात्र हे प्रकरण त्या हत्याकांडा पेक्षाही भयंकर यामुळे आहे, कारण या पतीने पत्नीच्या शरीराचे फक्त तुकडेच केले नाही तर ते तुकडे भटक्या कुत्र्यांसमोर टाकले.
या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहे. केवळ महिना भरापूर्वीचे या दोघांचं लग्न झालं होतं. दोघांनी प्रेम विवाह केला होता. रुबिका पहाडीया असं पत्नीचे नाव होतं. तर दिलदार अन्सारी असं संशयित पतीचं नाव आहे. या घटने संदर्भात पोलिसांनी संशयीत पतीला आणि त्याच्यासोबत आठ नातेवाईकांना अटक केली आहे.
पळून पोलिसांच्या साक्षीने केला होता विवाह
मिळालेल्या माहितीनुसार रुबिका ही पहाडिया या आदिवासी समुदायाची होती. दिलदार अन्सारीचा हा दुसरा विवाह होता. रुबिका आणि दिलदार यांचं प्रेम विवाह झाला होता. त्यांचं खूप दिवसांपासून अफेअर होतं. मात्र दोघांचेही कुटुंबीय लग्नासाठी तयार नव्हते. त्यामुळे महिनाभरापूर्वीच दोघांनी घरातूनच पळूनच जाण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे ते पळाले देखील. घरातून पळून जाऊन पोलीस ठाणे गाठलं आणि पोलिसांच्या साक्षीनं दोघांचं लग्न झालं. मात्र लग्नानंतर कुटुंबात भांडणे वाढू लागली आणि यातच दिलदार याने रुबिकाला संपवण्याचा कट रचला. त्याने ठरवल्या प्रमाणे तिची हत्या केली आणि तिच्या शरीराचे तुकडे केले. मात्र यापेक्षाही थरारक बाब म्हणजे ते तुकडे त्याने भटक्या कुत्र्यांना खाण्यासाठी टाकले.
शरीराचे १८ तिकडे तर मिळाले…
आतापर्यंत रुबिकाच्या मृतदेहाचे १८ तुकडे मिळून आले आहेत. बाकी मात्र भटक्या कुत्र्यांचे अन्न बनले अशी शक्यता आहे. शनिवारी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली. तपासात एक शस्त्र देखील जप्त झाले. नंतर रुबिकाच्या खुनासाठी दिलदार ला त्याच्या कुटुंबीयांनी मदत केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय. पोलीस दिलदारचे वडील, आई, पहिली पत्नी, भाऊ यांची चौकशी करत आहे. तर वारंवार समोर येत असलेल्या अशा घटना काळजाचा थरका उडवणाऱ्या आहेत. त्यासोबतच या घटनांमुळे समाजात वाढत चाललेली क्रूरता ठळकपणे दिसून येत आहे.