प्रियसी आपल्याला धोका देत दुसऱ्या तरुणासोबत संबंधांमध्ये असल्याच्या या संशयावरून प्रियकराने प्रियसीचा २६ वेळा स्क्रू ड्रायव्हर भोकसून निर्घृणपणे हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसर हादरला असून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. निल कुसुम पन्ना (वय. २०) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची चार पथक फरार आरोपी प्रियकराचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय नील कुसूम पन्ना ही कोरबाच्या पंप हाऊस कॉलनी मध्ये राहत होती. तिचे शहाबाद खाना मुख्य सोबत प्रेम संबंध होते. शहाबाद सध्या गुजरातच्या एका कंपनीमध्ये नोकरीस होता. तेथून तो तरुणीला फोन करण्याचा प्रयत्न करत होता. पण तिचा मोबाइल नेहमीच व्यस्त येत होता. यामुळे तिचे दुसऱ्या एखाद्याशी अफेयर सुरू असल्याचा संशय त्याला आला.
याविषयी त्याने कुसूमला जिवे मारण्याची धमकीही दिली होती. एक युवक कुसूमचा दूरचा नातलग होता. त्याचे नेहमीच तिच्या घरी येणे-जाणे होते. त्याच्यावर शदाबचा संशय होता. त्यावरून शदाबचे खटकले. त्याने डोक्यात संशयाचे भूत घेऊन तो कुसुमला ठार मारण्यासाठी विमानाने गुजरातून कोरबाला पोहोचला. 24 डिसेंबर रोजी तो तिच्या घरी पोहोचला आणि तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर अचानक आपल्या सोबत आणलेल्या स्क्रू ड्रायव्हरने तिच्या शरीरावर 26 हुन अधिक वेळा वार केले.
यानंतर शादाब घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून पोलिसांची चार पथक त्याचा शोध घेत आहेत.