आतापर्यंत सासरच्यांकडून सुनेला मारहाण झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या आणि वाचल्या असतील. एवढच नाही डोमेस्टिक व्हायलन्स (Domestic Violence) मध्ये सुनेची हत्या केल्याचेही अनेक प्रकरणं घडले आहेत. मात्र आता जी घटना समोर येत आहे ती अगदी या उलट आहे. कारण इथे सुनेनेच सासऱ्याला अमानुष मारहाण केली आहे (The daughter-in-law beat the father-in-law) आणि या घटनेचा व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर(Social Media, Video Viral) व्हायरल झाला आहे.
उत्तरप्रदेशच्या कानपूर (Kanpur Uttar Pradesh) या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. सून आणि सासऱ्यांच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेत एका महिलेनं आपल्या सासऱ्यांना अमानुष मारहाण केली आहे (The daughter-in-law beat the father-in-law). हा व्हिडिओ समोर आला असून याप्रकरणी आता मारहाण झालेल्या पीडित सासऱ्यांनी सूनेवर गंभीर आरोप केले आहे. घटनेत ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली त्या व्यक्तीचं नाव अरुण कुमार तिवारी (Arun Kumar Tiwari) असं आहे. ते कानपूरच्या काकादेव (Kanpur, Kakadev) इथे वास्तव्यास आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्त अरुण तिवारी यांना १० लाख रुपये मिळाले होते. आणि याच निवृत्तीच्या पैशांवर सूनेची वाईट नजर असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे. १० लाख रुपये आणि त्यांच्या नावावर असलेले घर आपल्या नावावर करुन घेण्यासाठी सूनेनं अमानुषपणे मारहाण केली असल्याचा आरोप तक्रारदार अरुण तिवारी यांनी केला आहे. याच कारणावरून सून मला छळत असल्याचंही ते म्हणतात. मी तिला पैसे देण्यास नकार दिला म्हणून तिने मला बोलावून भर रस्त्यात चारचौघांसमोर अमानुष मारहाण केली. इतकंच नाही, तर रस्त्यावर मला आपटल्यानंतर ती माझ्या छातीवरच बसली. नंतर माझा मोबाईलही तिने फोडला, असा देखील आरोप अरुण तिवारी यांनी केला आहे. तर आपल्या सुनेविरोधात याआधीही पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे, पण अद्याप कोणताही कारवाई करण्यात आली नसल्याचंही तिवारी यांनी म्हंटल्याचे समजत आहे.
दरम्यान आता दिलेल्या तक्रारीनुसार आणि मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. समोर आलेले व्हिडीओ, सासऱ्यांचं म्हणून आणि इतर नातलगांच्या चौकशीतून योग्य ती कारवाई संशयित आरोपीवर केली जाईल, असं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलंय. मात्र ही घटना समोर आल्यानंतर कानपूरमध्ये खळबळ उडाली आहे.