उत्तरप्रदेशात एक खळबळजनक घटना घडली आहे. सासू आणि सासऱ्यांना चहातून झोपेच्या गोळ्या देऊन एका सूनेने प्रियकरासोबत धूम ठोकली आहे. जाताना तिने लाखों रुपयांसह दागिन्यांवरही डल्ला मारला आहे. घटना उत्तरप्रदेशातील शाहजहांपूरमधील असून घटनेने परिवार हादरून गेला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सून आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला हिचे एहसान नामक युवकाशी प्रेम संबंध होते. तिचे हे प्रेम संबंध तिच्या घरच्यांना कळले तेव्हा त्यांनी तिचा विवाह कांत नगरातील विकास राठोड याच्याशी लावून देण्यात आला. यादरम्यान त्यांना एक मुलगीही झाली. मात्र, लग्न होऊनही शोभाचे एहसानसोबतचे प्रेमसंबंध संपले नाहीत. ती त्याच्याशी मोबाईलवरून बोलायची. दरम्यान, सासरच्या मंडळींनाही शोभाच्या प्रेमसंबंधांची कुणकुण लागली होती. त्यामुळे सासरच्या मंडळींनी तिला चांगलेच सुनावले होते.
मात्र, याचा काहीही परिणाम शोभावर झाला नाही. तिने प्रियकरासोबत पळून जाऊन सेटल होण्याचा निर्णय घेतला. प्रियकराच्या सांगण्यावरून तिने नशेच्या गोळ्या चहामध्ये मिसळून सासू, पती व सासऱ्याला दिल्या. त्यामुळे सर्वजण बेशुद्ध पडले. यानंतर तिने रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळ काढला. या घटनेची मोठी चर्चा होत आहे. सध्या शोभा आणि तिचा प्रियकर एहसान पोलिसांच्या ताब्यात आहे.
मात्र सिनेमालाही लाजवेल असा हा प्रसंग घडला आहे. मागील काही दिवसांपासून देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत. यावर पोलिसांनी काही कडक उपयोजना करण्याची गरज आहे.