by : ऋतिक गणकवार
सत्ताधारी आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात एकमेकांवर केलेल्या टीकांमुळे चांगलीच जुंपली होती. त्यात रवी राणा यांनी कडू यांच्यावर केलेली खोक्यांची टीका ही कडू यांच्या चांगलीच जिव्हरी लागली होती. यावरून पुन्हा एकदा राज्यात राजकीय घमासान सुरु झाले होते. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या दोघांत मध्यस्थी करत विषय मिटवायचे केले होते. त्यामुळे हा वाद आता मिटला असला तरी बच्चू कडू यांनी आज अमरावतीत प्रहार संघटनेचा मेळावा घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच विरोधाकांसाहित त्यांच्या नादाला लागणाऱ्यांना देखील त्यांनी इशारा दिला आहे.
रवी रणांवर टीका
बच्चू कडू म्हणाले की सत्ता चुलीत गेली. प्रहार काही अंडु पांडू नाही. वार करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. आमच्या वाटेला आले तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही. 350 गुन्हे घेऊन अंगावर घेऊन फिरतोय असे म्हणत त्यांनी रवी राणा यांच्यावर टीका केली आहे.
पहिली वेळ म्हणून माफ
“कोणी काय म्हटलं हा विषय महत्त्वाचा आहे. कारण अस्तित्वाचा आहे. कोणीही यावं आणि काहीही म्हणावं एवढे काय आम्ही स्वस्त नाहीये. पहिली वेळ आहे माफ आहे. आगे कुछ करेगा और कोईभी करेगा ना… मग प्रहारचा वार काय असतो हे तुम्हाला सांगू”, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला.
विरोधकांचा समाचार
“गरिबांची मुलगी गेली तर पळाली,श्रीमंतांची गेली तर लव्ह मॅरेज”, अशा शब्दात बच्चू कडू बंडखोर आमदारांवर टीका करणाऱ्या विरोधकांवर जोरदार टीका केली.
रणांसोबतचा विषय संपला
बच्चू कडू बोलताना म्हणाले की, राणांबरोबरचा विषय संपला आहे. आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून आम्हाला बदनाम केले जात आहे. आम्ही गुवाहाटीला का गेलो? माझ्याकडे मंत्रिपद होते. मंत्रिपद सोडून कोण जाते का? पण जिथे तत्त्व येते तिथे काही निर्णय घ्यावे लागतात, असे बच्चू कडू मेळाव्यावेळी बोलताना म्हणालेत.