राज्यात पुन्हा ‘हिंदुहृदयसम्राट’ हा शब्द गर्जत असून नव्या हिंदुहृदयसम्राटांच्या घोषणा अलीकडे देण्यात आल्या होत्या. भाजपचे आमदार नीतेश राणे हे देवेंद्र फडणवीसांना हिंदुहृदयसम्राट समजतात. तर मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरेंना हिंदुहृदयसम्राट समजतात. नितेश राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख केल्यानंतर अनेक चर्चांना उधान आलं. मात्र राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी नाशकात मोठे वक्तव्य केले असून ते म्हणाले, मला विचारलं तर एकच हिंदुहृदयसम्राट आहेत ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी हे विधान केले आहे. त्यांनी राज्यात घडत असलेल्या महत्वाच्या घडामोडींवर देखील भाष्य केले आहे.
दसरा मेळावा दणक्यात साजरा होणार !
मंत्री भुसे यांनी सांगितले की, शिवसेनेच्या वतीने दसरा मेळावा उत्साहात साजरा केला जाणार आहे. काल या बाबत बैठक झाली असून आमचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा पार पडेल. त्यामुळे दादा भुसे यांच्या वतीने पुन्हा सांगण्यात आले आहे की आम्हीच खरी शिवसेना आणि आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हेच आहेत.
जिल्ह्यावर लम्पिचे संकट घोंगावत आहे
देशपातळीवर लंपी आजाराचे प्रादुर्भाव सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात ज्या ठिकाणी जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. त्याठिकाणी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. जनावरांना लस देण्याचे देखील काम सुरू झाले आहे. यासाठी लागणारा निधी देखील नशिकसाठी उपलब्ध झाले आहे. अशी माहिती मंत्री भुसे यांनी यावेळे दिली आहे.
मुख्यमंत्र्यांच पाहून काही जण दर्शनाला आले ! विरोधकांना टोला
लवकरच मुख्यमंत्री राज्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात जिल्ह्याचा आढावा ते घेणार आहेत. इतर नेत्यांच्या दौऱ्याला काऊंटर म्हणून हा दौरा नाही. विकासकामे जनतेपर्यंत पोहचावे म्हणून मुख्यमंत्री हा दौरा करत आहेत. असे भुसे यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री घरीच दिसतात या विरोधकांच्या टीकेला देखील मंत्री भुसे यांनी प्रतिउत्तर दिले असून ते म्हणाले, जनतेमध्ये जाणे चुकीचे आहे का? मुख्यमंत्र्यांच पाहून आता इतर नेते फिरत आहेत. गणपती दर्शनाला देखिल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच पाहूनच बाहेर पडले असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला मारला.
अजूनही पालकमंत्री नाही
दावेदरीच्या कारणामुळे अजूनही पालकमंत्र्यांची निवड करण्यात आलेली नाही. तसेच पालकमंत्री निवडीचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितले आहे.