by : ऋतिक गणकवार
मुलगा रोज दारू पिऊन भांडण काढत असत या मुलाच्या आणि बापाच्या भांडणाचा शेवट अखेर हत्याकांडाने झाला असून बापाने कुऱ्हाडीचे घाव घालून मुलाचा खून केला. ही धक्कादायक घटना मावळमधील सुदुंबरे गावात घडली असून घटनेने गाव हादरून गेला आहे. समीर बोरकर असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यता आला असून आरोपी बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळमध्ये बाळू बबन बोरकर व त्याचा मुलगा समीर वास्तव्यास होते. मुलगा समीर हा रोज दारू पिवून येत होता. दारूच्या नशेत त्याचे व वडीलांमध्ये नेहमी भांडण होत असे. यात वडील हे नेहमी त्रागा करत असत, व मुलांवर बापाचा राग होता. या भांडणाचा शेवट झाला पाहिजे असे वारंवार बाप बोलून दाखवत होता. शेवटी बापाने कुऱ्हाडीचे घाव घालून मुलाचा खून केला.
आरोपी बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहे. दरम्यान या घटनेने गाव हादरले असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. अखेर या बाप आणि मुलाच्या भांडणाचा शेवट अश्याप्रकारे झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मात्र राज्यात आता गुन्हेगारी वाढल्याचे चित्र आहे. त्यात खुनाचे प्रकार अधिक असून शुल्लक कारणांवरून हे गुन्हे घडत आहेत. राज्य पोलिसांनी यावर काही कडक पाऊले उचलण्याची गरज आहे. गुन्हेगारांना आता पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे मागील काही घटनांवरून लक्षात येते.