महिला शेतात एकटी असल्याचा फायदा घेत केला बलात्कार! व्हीडीओ केला व्हायरल

औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतात महिला एकटी असल्याचा फायदा घेत गावातीलच एकाने महिलेवर लैंगिक अत्याचार केले. त्यात आणखी धक्कादायक म्हणजे बलात्कार करतानाचा व्हीडीओ बनवून पुन्हा आणखी तिघांनी मिळून बलात्कार केला, व घटनेचा व्हीडीओ व्हायरल केला आहे. ही संतापजनक घटना गंगापूर तालुक्यातील एका गावात घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेची अधिक माहिती अशी की, पिडीत महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, पिडीता 10 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता महिला आपल्या गाईसाठी गवत आणण्यासाठी शेतात गेली होती. शेतात दुसरे कोणीही नसल्याचा फायदा घेत गावातील भगवान अशोक सुकासे हा महिलेजवळ आला. तुझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवू दे असा म्हणून लागला. त्यामुळे महिला घाबरून तेथून निघून जाऊ लागली. मात्र आरोपी भगवान सुकासे याने महिलेवर बळजबरीने बलात्कार केला आणि बलात्कार करतानाचा व्हिडिओ देखील केला. 

याबद्दल जर कोणाला काही सांगितले तर तुझा व्हिडिओ सर्व गावात दाखवेल व तुझी बदनामी करेल त्यामुळे तुझा पती तुला मारहाण करेल व घरातून काढून देईल अशी धमकी आरोपीने महिलेला दिली. त्यामुळे महिलेने याबद्दल कुठेही काही सांगितले नाही.

1 डिसेंबर रोजी पीडित महिला रस्त्यात एकटी पाहून तिला पुन्हा भगवान सुकासेने अडवले. यावेळी तिच्यासोबत रामेश्वर अशोक सुकासे आणि अमरनाथ सुनिल सुकासे हे देखील दुचाकीवर आले. व पुन्हा बाजूला असलेले शेतात नेऊन तिघांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. यानंतर अशोक सुकासे याने बनवलेला व्हीडीओ गावात व्हायरल झाला.

यानंतर घटना उघडकीस आली. महिलेच्या पतीपर्यंत हा व्हिडिओ पोहचल्याने त्यांना धक्काच बसला. त्यामुळे त्यांनी पत्नीच्या भावाला बोलावून माहेरी घेऊन जाण्याचे सांगितले. त्यानंतर महिलेचा भाऊ आल्यावर पीडित महिलेने आपल्या भावाला सोबत घेऊन गंगापूर पोलीस ठाणे गाठले. तसेच वरील तीनही आरोपींच्या विरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला.