Home » शिक्षक बनला भक्षक; अल्पवयीन मुलीशी करायचा लगट, अश्लील व्हिडीओ पाठवत…

शिक्षक बनला भक्षक; अल्पवयीन मुलीशी करायचा लगट, अश्लील व्हिडीओ पाठवत…

by नाशिक तक
0 comment

आपल्याला जीवनाच्या मार्गात सर्वात मोठ मार्गदर्शन शिक्षक असतात मात्र जर शिक्षकच भक्षक बनले तर असाच एक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला आहे. जिम्नॅस्टिक प्रशिक्षकाने विद्यार्थींनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्रशिक्षका विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे शिक्षकी पेश्याला काळिमा फसला गेला असून नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील १५ वर्षाची मुलगी जिम्नॅस्टिक हाॅल येथे सराव करत असताना तिच्याशी प्रशिक्षक लगट करण्याचा प्रयत्न करायचा तसेच चेंजीग रुममध्ये कपडे बदलताना ताे तिला चोरून पहायचा. तसेच पिडीतेला मोबाईलवर अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाठवण्याचे घाणेरडे प्रकार देखील ताे करत असे. असले प्रकार वारंवार होत होते, या त्रासाला कंटाळून पिडीत मुलीने तिच्या कुटूंबियांना याबाबतची माहिती दिली. यावेळी कुटुंबाला देखील धक्का बसला. पिडीत मुलीच्या आईने तातडीने पाेलिस ठाण्यात धाव घेतली. तिने प्रशिक्षक आपल्या मुलीला त्रास देत असल्याची तक्रार दिली.

प्रशिक्षकाच्या मुसक्या आवळल्या

 पाेलिसांनी प्रशिक्षक जयपाल रेड्डी याच्या विरोधात विनयभंग आणि पाेक्साे अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पाेलिसांनी रेड्डीला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेने शिक्षकी पेश्याला काळिमा फसला गेला आहे. प्रशिक्षकानेच असे अमानवीय कृत्य केले असून यामुळे नांदेड मध्ये खळबळ उडाली आहे.

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!