स्थायी सभापतीसह समितीचा कार्यकाळ आज संपणार

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिका स्थायी समिती सभापतीसह सदस्यांची मुदत आज (दि.२८) रोजी संपत आहे. यामुळे आज सकाळी एक व दुपारनंतर एक अशा दोन स्थायी समितीच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहे.

दरम्यान नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. एक फेब्रुवारी रोजी प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर त्यावर १४ फेब्रुवारी पर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या, तर २३ फेब्रुवारी रोजी यावर राज्य निवडणूक आयोगाच्या विशेष अधिकारी यांनी सुनावणी घेण्यात आली. बुधवारी (दि. ०२) रोजी अंतिम अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे जाणार आहे.

दरम्यान नाशिक महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडली आहे. स्थायी समितीची मुदत आज (दि. २८ फेब्रुवारी) रोजी संपणार आहे. त्याच प्रमाणे महापौर तसेच सर्व नगरसेवकांची मुदत दोन आठवड्यानंतर म्हणजेच १४ मार्च २०२२रोजी संपणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका प्रशासन सतर्क झाले असून वेळप्रसंगी शासनाकडे मार्गदर्शन देखील मागविल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान कोट्यवधी रुपयांची विकासकामे शहरात सुरू असून कोट्यवधींची कामे प्रलंबित देखील आहे. ही कामे मार्गी लागावी तसेच वेळेत त्याचे टेंडरिंग व्हावे, यासाठी स्थायी समिती सभापती गणेश गीते व सदस्य प्रयत्नशील आहे. यामुळेच आज दोन सभा होणार आहे. यानंतर स्थायी समितीचा कार्यकाळ संपणार आहे.