पॅरोलवरील कैद्याची भयंकर हत्या! शीर फुटबॉल सारखे खेळले

चंद्रपुरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पॅरोलवर बाहेर आलेल्या कैद्याला बेदम हाणामार करत टोळक्याने खून केला त्यात आणखी भयंकर म्हणजे धारदार शस्त्राने त्याचे मुंडक धडावेगळे करत शीर पायाने फुटबॉल सारखे रस्त्यावर खेळले. ही धक्कादायक घटना जिल्ह्यातील दुर्गापुर येथे रात्रीच्या दरम्यान घडली. महेश मेश्राम असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दाेघांना अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहराजवळील दुर्गापूर येथेल महेश मेश्राम यांचा तीन ते चार जणांनी खून केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. दुर्गापूर मुख्य मार्गावर हा खून झाला. मेश्राम हा तो नुकताच कारागृहातून पॅरोलवर बाहेर आला होता. मेश्राम यांना आधी टाेळक्याने मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याचे मुंडक धडावेगळे केले. त्यानंतरही त्यांनी महेश याचं शीर पायाने फुटबॉल सारखे रस्त्यावर खेळल्याची चर्चा आहे.

दरम्यान, घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतक महेश मेश्राम यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. नुकताच तो कारागृहातून बाहेर आला होता. संशयितांचा आणि मेश्रामचा वाद नेमका कशामुळे झाला याबाबत सविस्तर माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

राज्यात गुन्ह्रागरीचे प्रमाण वाढत असून काही शुल्लक कारणांवरून हत्या घडवल्या जात आहेत. ह्या घटनेमुळे परिसर हादरला असून गुन्हेगारांना पोलिसांचा कोणताही धाक नसल्याचे या घटनेतून पाहायला मिळाले. पोलिसांनी शहरात कायदा सुव्यवस्थेला धक्का लागणार नाही अश्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.