TET परीक्षा घोटाळा; अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावे आल्याने सत्तार अडचणीत

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळा प्रकरणाचला आता नवे वळण लागले आहे. यामध्ये नवा खुलासा झाला असून यात टीईटी घोटाळ्यात माजी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोन मुलींचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.

परीक्षा परिषदेकडून गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये तब्बल ७ हजार ८७४ विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश आहे. सायबर पोलीस आणि परीक्षा परिषद यांनी जी यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींचा समावेश आहे. या ७ हजार ८७४ विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरूपी मनाई करण्यात आली आहे. हिना आणि उजमा या दोन्ही शिक्षिका अब्दुल सत्तार यांच्या मुली असून २०२० मध्ये त्याही अपात्र झाल्या असून, सायबर पोलीस आणि परीक्षा परिषद यांनी जी यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये या दोन्ही मुलींचा समावेश आहे

याप्रकरणी सत्तार म्हणाले, माझी बदनामी करण्यासाठी कट रचला जातोय असा आरोप केला आहे. माझ्या मुलींची चुक असेल तर नक्की कारवाई करा. मात्र बदनामी करणाऱ्यांना फासावर लटकवा. या प्रकरणाची नीट चौकशी करा अशी मागणी करत सत्तार यांनी बदनाम करण्याचे काम कुणीही करु नये. सर्वांनी आपापल्या पद्धतीने दक्षता घ्यावी. याची सर्व विचारपूस करण्यासाठी शिक्षण अधिकारी आहेत. त्यांच्याकडे यासंदर्भात तक्रार गेली असेल. जर त्यामध्ये नावं आढळल्याच आम्ही जबाबदार आहोत. पण चुकीची माहिती देऊन बदनामी करण्यात येत असेल तर त्याच्यावर धडक कारवाई करावी अशी प्रतिक्रिया देत सत्तार यांनी मुलींवर झालेले आरोप नाकारले आहेत.

सोबत कॉंग्रसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील या प्रकरणावर अब्दुल सत्तार यांना घेरल आहे. अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलांचे TET प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांचा TET घोटाळ्यात सामावेश आहे का अशा चर्चा सुरू झाल्यानंतर चव्हाणांनी त्यांच्यावर निशाणा साधत, आता त्यांनाच शिक्षणमंत्री करतील असा खोचक टोला लावला आहे.