द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत ठाकरेंनी केले मोठे विधान.! 

शिवसेनेच्या 40 आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळून शिवसेना शिंदे गट व भाजपचे सरकार सत्तेत आले त्यानंतर आता शिंदे गट व शिंदे गटाच्या समर्थनार्थ अनेक नगरसेवक शिंदे गटात सामील होत आहेत तर अनेक शिवसेना पदाधिकारी शिंदे घाटात सामील होण्यासाठी राजीनामे देत आहेत .या नंतर आता शिवसेनेचे खासदारही बंडखोरीच्या तयारीत असून शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा चालू आहेत. यादरम्यान आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत संवाद साधला आहे.

ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना बरेच काही महत्त्वाची वक्तव्य केली आहेत त्याबरोबरच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबतही त्यांनी वक्तव्य केलं आहे.या वेळी ठाकरे यांनी बोलताना राष्ट्रपती पदाच्या एनडिएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यायचा की नाही हे खासदारांसोबत बोलून ठरवेल जाईल असं विधान केलं आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिलेली असून आता शिवसेनेचे खासदारही या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे सांगत आहेत.

उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा देण्यासंदर्भात हे वक्तव्य केल्याने आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना द्रौपदी मुर्मू ह्यांची पार्श्वभूमी व सामाजिक क्षेत्रातील कार्य लक्षात घेता द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा व तसे आदेश सर्व शिवसेना खासदारांना द्यावेत.बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना-भाजप युती असताना एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा न दर्शविता मा. श्रीमती प्रतिभाताई पाटील या महाराष्ट्रातील असल्या कारणाने त्यांना पाठिंबा दर्शवला होता. तसेच, प्रणव मुखर्जी यांना देखील वंदनीय शिवसेनाप्रमुखांनी पाठिंबा दिला होता.अश्या आशयाचे पत्र दिले आहे

शिवसेनेचे खासदार शेवाळे यांनी असे पत्र लिहीत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएने दिलेल्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे सांगितले होते . आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत खासदारांशी बोलून पाठिंबा देण्यासंदर्भात सांगितलं जाईल असे विधान केल्याने उद्धव ठाकरे काय भूमिका घेता कोणाला पाठिंबा देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.