Home » ठाकरे v/s शिंदे-फडणवीस; सीमावादावरून एकमेकांवर कडाडून हल्ला

ठाकरे v/s शिंदे-फडणवीस; सीमावादावरून एकमेकांवर कडाडून हल्ला

by नाशिक तक
0 comment

मुंबई : ‘महाराष्ट्राचे तुकडे करणे हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे’, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. दरम्यान त्यांच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंवर हल्ला केला. त्यामुळे कर्नाटक सीमेवरील महाराष्ट्राच्या हद्दीतील चाळीस गावांचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा वाद उभा करताना दिसत आहे.

महाराष्ट्राच्या हद्दीतील चाळीस गावं कर्नाटकात येतील, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई यांनी केला. त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद उफाळून निघाला आहे. दरम्यान त्यांच्या याच विधानाचा समाचार आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला. उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह, छत्रपती शिवाजी महाराजांचबद्दल वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि इतर विविध मुद्द्यांवरुन भाजपला लक्ष केले.

“महाराष्ट्रात मिंधे सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची सातत्याने अवहेलना होत आहे, मग ते महाराष्ट्रातील प्रकल्प जाणे, महाराष्ट्राची अस्मिताबद्दल असेल, सातत्याने अवहलेना होत आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात जणूकाही भूत संचारलेलं आहे”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

यावर प्रत्युत्तर देताना कर्नाटक सीमा प्रश्नासाठी माविआने काय केलं ? असा प्रश विचारला. याबद्दल आम्हाला शिकवण्याची गरज नाही आणि बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणाऱ्यांनी आम्हाला शिकवायची गरज नाही. असा हल्ला त्यांनी चढवला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, या सीमावादात कोणी राजकीय रंग आणू नये, पवार बोलले की उद्धव ठाकरेंना बोलाव लागत म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेतली असा देखील टोला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात अवमानकारक उद्गार काढले. त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भगतसिंह कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदचे संकेत देखील दिले आहे. दोन ते चार दिवसात हे पार्सल राज्यातून नाही गेलं तर आम्ही महाराष्ट्र बंद करू किंवा विराट मोर्चा काढू असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यावर बोलताना छत्रपती शिवरायांचे नाव घेण्याचा त्यांना अधिकार आहे का ? असा प्रश्नच मुख्यमंत्र्यांनी विचारला आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!