टेस्ट ड्राईव्हला दुचाकी दिली अन परत आलीच नाही…

नाशकात एक खळबळजनक प्रकार घडला आहे. एकाने आपली ॲक्टिवा मोपेड दुचाकी विकायला काढली, त्यात ती दुचाकी विकत घेण्यासाठी आलेल्या संशयिताने ॲक्टिवा (MH 15 AM 8400) टेस्ट ड्राईव्हसाठी घेऊन गेला आणि तो परत आलाच नाही. हा खळबळजनक प्रकार गायकवाड नगर, मुंबई नाका परिसरात घडला असून घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस संजय बोथरा (रा. जैन कॉलनी, गायकवाड नगर, मुंबई नाका) यांनी हे, गेल्या बुधवारी (ता. १९) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बोथरा यांच्या फोनवर अनोळखी व्यक्तीने संपर्क साधून मी समीर मोतीवाला बोलत असून मला तुमची ॲक्टिवा ३० हजाराला विकत घ्यायची असल्याचे म्हणाला. त्यानंतर तो बोथरा यांच्या घरी आला आणि ट्रायल घ्यायची म्हणून ॲक्टिवा घेऊन गेला. मात्र बर्याच वेळ होऊनही तो परतलाच नाही. याप्रकरणी बोथरा यांनी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नाशकात पार्किंगमधून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली असून दुचाकी चोरांना पोलिसांचा काही धाक नसल्याचे दिसून आले आहे. मात्र आता या संशयिताने नवी शक्कल वापरून दुचाकी लंपास केली आहे. मात्र या घटनेने आता इतरांमध्येही भीती निर्माण झाली असून आपली दुचाकीवर कडी नजर ठेवताय. घटनेने परिसरात खळबळ उडाली असून कोणी काय करेल याचा आता भरोसा राहिला नाही. त्यामुळे पोलिसांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.