मित्रांसोबत पार्टीला गेलेल्या ‘त्या’ युवकाचा मृतदेह आढळला

By : Pranita Borse

नाशिक : बेपत्ता झालेल्या तरुणाचा (missing youth) मृतदेह गोदावरीच्या पात्रात (godavri river) तरंगताना मिळून आला आहे. ९ नोव्हेंबर दीपक गोपीनाथ दिवे (Deepak Gopinath Dive) हा तरुण मित्रांसोबत बाहेर गेला होता. मात्र त्यानंतर तो परतलाच नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी गंगापूर पोलिसांत (Gangapur Police station, Nashik) बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान आता तरुण नदी पत्रात मृत अवस्थेत आढळून आल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. ही आत्महत्या की घातपात याचा शोध पोलिस करत आहेत.

बुधवारी (दि. ९) रोजी चौघा मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गोदापार्क परिसरात गेलेला युवक दीपक गोपीनाथ दिवे (२७, रा. राहुलनगर) हा घरी परतलाच नव्हता. त्यामुळे नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या युवकाचा गंगापूर पोलीस तसेच नातेवाईक कसून शोध घेत होते. दरम्यान काल त्याचा मृतदेह गोदावरीच्या पात्रात तरंगताना नातेवाईकांना आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आहे. मात्र या घटनेशी निगडीत अजून काही माहिती समोर येत असल्याने प्रकरणासंदर्भात अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. त्या रात्री दीपक सोबत असलेल्या त्याच्या साथीदारानेही आत्महत्या केल्याने प्रकरण गुंतागुंतीचे झाले आहे.

दिपकच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र त्याच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. दीपक दिवे बेपत्ता झाल्याची तक्रार गंगापूर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. या प्रकरणात दीपक सोबत पार्टीसाठी असलेल्या मित्रांना देखील पोलीस चौकशीसाठी बोलवले होते. त्यातच रविवारी (दि.१३) विजय जाधव याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली होती. विजय हा दीपकचा मित्र. तो देखील बेपत्ता होता. जो की ९ नोव्हेंबरच्या रात्री दिपकसह पार्टीसाठी गेला होता. मात्र विजय जाधवने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आणि दिपक बेपत्ता झाला आणि त्यानंतर आता अचानक दीपकचा मृतदेह गोदावरीच्या पात्रात तरंगताना मिळून आल्यामुळे याप्रकरणात घातपाताचा संशय बळावला आहे.

दीपक दिवे आणि त्याचा मित्र विजय जाधव या दोघांच्या मृत्यूचा काही संबंध आहे का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दोघेही त्या पार्टीनंतर बेपत्ता आणि नंतर दोघांचाही मृत्यू होणे केवळ योगायोग की या मागे काही षडयंत्र ? या दिशेने पोलिस तपास करत आहेत.