धक्कादायक.! चौथीत शिकणाऱ्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

पंचवटी : अवघ्या चौथीत शिकणाऱ्या मुलाने पंख्याला दोरी बांधून गळफास घेत जीवन संपविले. मुलाची आई रात्री कामावरून घरी आल्यानंतर दरवाजा उघडताच मुलगा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

दिंडोरीरोड जवळील अवधुतवाडीत कांबळे कुटुंबीय राहतात. रविवारी (दि.१५) आर्यन कांबळे हा घरात एकटाच होता. त्याची आई रुग्णालयात कामाला गेली होती. तसेच मोठा भाऊ देखील बाहेर गेलेला होता. आर्यन एकटाच टीव्ही बघत होता, मोबाईल खेळत होता. मात्र त्याने पंख्याला दोरी बांधून आत्महत्या केली. पण आत्महत्येच कारण काय याचा उलगडा झाला नाही. जेव्हा आर्यनची आई घरी आली, त्यांनी दरवाजा वाजवला. मात्र खूप वेळ वाट बघूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी जोरात दरवाजा उघडला. आपल्या मुलाला लटकलेल्या अवस्थेत बघून आईने जोरात आरडओरडा केला. त्यांच्या आवाजाने आजूबाजूचे लोक जमा झाले.

आर्यनच्या पश्चात आई, वडील, भाऊ आहे. त्याच्या अश्या आकस्मिक जाण्याने परिसरात नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. आर्यनच्या आत्महत्येच कारण काय याचा अधिक तपास पंचवटी पोलिस करत आहेत.