By चैतन्य गायकवाड
नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) हे दिल्ली (Delhi) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात या दोन्ही नेत्यांनी भाजपा पक्षश्रेष्ठींची तसेच दिग्गज नेत्यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली आहे.
पंतप्रधानांच्या ‘७-लोककल्याण मार्ग’ या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा सुरू आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विठ्ठल आणि रखुमाई ची मूर्ती भेट दिली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहे. त्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा अशा दिग्गज नेत्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
दरम्यान, या दोन्ही नेत्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. अमित शहा यांनी एक ट्विट केले आहे. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली. या दोघांनाही शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पूर्ण निष्ठेने जनतेची सेवा करतील आणि महाराष्ट्राला नव्या उंचीवर घेऊन जातील'” अशा विश्वास त्यांनी ह्या ट्विट मध्ये व्यक्त केला आहे.
दरम्यान मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. त्यानंतर मुख्यमंत्री दिल्लीहून थेट पुण्याला येणार आहेत. पुण्याहून मुख्यमंत्री पंढरपूरला जाणार आहेत. पंढरपूरला त्यांच्या हस्ते आषाढीनिमित्त विठ्ठलाची पूजा होणार आहे, अशी माहिती माध्यमांनी दिली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित दिल्ली दौरा केला. या दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘राजकीय अजेंडा नव्हे, तर वरिष्ठांचा आशीर्वाद घेण्यासाठी हा दिल्ली दौरा आहे,’ असे विधान करत या राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.