जन्मदात्या आईची केली निर्घृण हत्या! अन मृतदेह बॉक्समध्ये पॅककरून नदीत फेकला.

मालमत्तेच्या कारणावरून एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईचीच निर्घृण हत्या केली आहे. बेसबॉलच्या बॅटने जबर मारहाण करत आईला संपवले व मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह बॉक्समध्ये पॅक करून मुंबईजवळील रायगड जिल्ह्यातील माथेरान भागात असलेल्या नदीत फेकून दिला. ही धक्कादायक घटना मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून घटनेने एकच खळबळ उडाली आहे. वीणा कपूर (वय ७४ ) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांत गुन्हा दाखल केला असून आरोपी मुलगा व त्याचा नोकर यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 डिसेंबर रोजी सचिन कपूर हा आपली आई वीणा कपूर बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी जुहू पोलीस ठाण्यात आला होता. पोलिसांनी तपास सुरू केला आणि सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यात हे लोक एक मोठी पेटी इकडे तिकडे हलवत असल्याचे समजले. पोलिसांना सचिन कपूर याच्यावरच संशय आल्याने त्याची चौकशी करण्यात आली. त्या चौकशीत घडलेला प्रकार समोर आला.

असा केला खून

6 डिसेंबर रोजी मुलगा सचिन व आई विना यांच्यात मालमत्तेवरून वाद झाला, हा वाद सचिनच्या डोक्यात गेला त्यामुळे त्याने नोकर छोटूशी हातमिळवणी करून बेसबॉलच्या बॅटने आईला मारहाण केली, बेदम मारहाण केल्यामुळे वीणा गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला.

आईची हत्या केल्यानंतर, सचिन आणि छोटूने पुरावे नष्ट करण्यासाठी आईचा मृतदेह एका बॉक्समध्ये भरला. नंतर कोठूनही काहीही दिसू नये म्हणून बॉक्स व्यवस्थित पॅक केले. ज्या घरात खून झाला, त्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला होता, त्यानंतर आरोपींनी घराचे सीसीटीव्ही फुटेज ठेवलेले डीव्हीआर काढले आणि तेही नष्ट केले. आरोपींनी वीणाचा मृतदेह बॉक्समध्ये पॅक करून मुंबईजवळील रायगड जिल्ह्यातील माथेरान भागात असलेल्या नदीत फेकून दिला.