‘त्या’ अर्भकाचा मृत्यू नैसर्गिक

नाशिक:- आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात तीन दिवसांपूर्वी महिलेच्या प्रसूतीनंतर परिचारिकेच्या हलगर्जीपणामुळे नवजात अर्भक खाली पडल्याने मृत झाल्याचा आरोप बालकाच्या पालकांनी केला आहे. परंतु नैसर्गिकरित्या झालेल्या प्रसूतीनंतर मृत अर्भक जन्माला आल्याचे रुग्णालयाचे म्हणणे आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालातही अर्भकाचा मृत्यू नैसर्गिक असल्याची नोंद आहे.

फाल्गुनी सुरज जाधव यांना सोमवारी प्रसूती वेदना सुरू झाल्याने त्यांच्या पतीने आडगाव वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. दुपारी फाल्गुनी यांची प्रसूती झाल्यानंतर अर्भक मृत झाल्याने आडगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. बुधवारी दुपारी या प्रकरणी मृत अर्भकाच्या पालकांनी महाविद्यालयाप्रशासनासह डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला. प्रसुतेवेळी परिचारिकेच्या हलगर्जीपणामुळे नवजात अर्भक खाली पडल्याने त्याच्या डोक्याला इजा झाल्याचा दावा पालकांनी केला.

या दाव्यानंतर संबंधित महिलेची महाविद्यालयात प्रसूती होती. सोमवारी प्रसूतीवेळी डॉक्टरांना समजले की,अर्भकाच्या हृदयाचे ठोके कमी होत आहे. डॉक्टरांनी अर्भकाच्या जन्मानंतर बराच प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. नवजात अर्भकाच्या पालकांनी केलेल्या दाव्यावरून शिवविच्छेदनाचा निर्णय घेण्यात आला. असे महाविद्यालयीन प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हा रुग्णालयातील सेवाविच्छेदन कक्षातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही नवजातरवकाचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी दाखल अकस्मात मृत्यूचा तपास आडगाव पोलीस करत आहेत. त्यातून घटनेमागील खरे कार्य स्पष्ट होण्याची शक्यता आहे.