नाशिक | जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गणांच्या प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा अखेर जाहीर झाला असून . जिल्ह्यात 11 गट आणि 22 गणांची अधिक भर पडली आहे. प्रारुप प्रभाग रचनेवर आठ जून 22 पर्यंत हरकती व सूनवण्या मागविण्यात आल्या आहेत .प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारूप आराखडयातील गट व गणांच्या सीमारेषांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत . गटांची संख्या 73 वरून 84 झाल्याने 11 गट नव्याने वाढले आहेत. देवळा, नांदगाव, येवला व इगतपुरी या चार तालुक्यात एकही गट वाढला नसून तेथील गट गण तसेच आहेत ,
जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रारूप आराखडा प्रसिध्द केला. असून जिल्हाधिकारी कार्यालयासह, तालुकास्तरावर तहसिल कचेरी, जिल्हा परिषद आदी ठिकाणी हा आराखडा लावण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने फेब्रुवारीमध्ये जाहीर केलेला नाशिक जिल्हा परिषदेच्या आराखडा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गण प्रारुप रचनांचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला होता. नव्या प्रारूप आराखड्यानुसार गट व गणांच्या सीमारेषांमध्ये महत्वाचे बदल झाले आहे. गटांची संख्या 73 गटांवरून 84 झाल्याने 11 गट नव्याने वाढले आहेत त्यानुसार हा नवीन प्रारूप आराखडा जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे .
नाशिक जिल्हा परिषदेचा नवीन प्रारूप आराखड्याची प्रतिष्ठतांसह इच्छुकांना मोठया प्रमाणात प्रतीक्षा होती अखेर आज प्रारूप आराखडा जाहीर झल्यानंतर नवीन आराखड्यानुसार गटात पुनर्रचना आणि बदल झाल्याने तसेच जुने गट रद्द करून नवीन गट तयार करण्यात आल्याने आता निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. कोण कोणाला आव्हान देत हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
अशी झाली आहे गटात नवीन वाढ
सुरगाणा तालुक्यात पूर्वी ३ गट होते, यात १ ने वाढून ४ झाले आहेत., पेठ तालुक्यात २ गट होते, १ गट वाढला असून ३ गट झाले आहेत
दिंडोरी तालूक्यात 5 गट होते. १ ने वाढून ६ गट झाले आहेत , बागलाण तालुक्यात ७ गट होते १ ने वाढून ८ गट झाले आहेत.
मालेगाव तालुक्यात ७ गट होते तर २ ने वाढून ९ झाले आहेत ,कळवण तालुक्यात ४ गट होते. १ ने वाढून 5 गट झाले आहेत.
चांदवड तालुक्यात ४ गटा १ गट वाढला असून ५ गट झाले आहेत, निफाड तालुक्यात १० गट होते आता ११ गट झाले आहेत
त्र्यंबकेश्वर तालुक्यात ३ गट होते आता ४ गट झाले आहेत,सिन्नर तालुक्यात ६ गट होते. आता १ ने वाढून ७ झाले आहेत ,नाशिक तालुक्यात ४ गट होते आता ५ गट झाले आहेत