मुंबई : राज्यात ९२ नगर परिषदांसह आणि ४ नगर पंचायतींच्या निवडणुकांना जाहीर करण्यात आल्या होत्या.पण निवडणूक आयोगाने या निर्णयाला आता स्थगिती दिली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीना आता आणखीनच विलंब होणार आहे. राज्य निवडणुक आयोगाचा हा मोठा निर्णय असल्याचं मानला जात आहे. या निर्णयाची मागणी सर्वच पक्षांची होती.या निवडणुकांचे अधिसूचना काढण्याची प्रक्रिया सुरु होती. पण आता निवडणुकांना स्थगिती मिळाल्यामुळे आता सर्वच काम थांबणार आहे. या निर्णयांचे सर्वांनी स्वागत केले आहे. राज्यात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे निवडणुका घेणे शक्यही झाले नसते.
काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने राज्यात 17 जिल्ह्यातील राज्यातील 92 नगर परिषदांसह 4 नगर पंचायतींच्या निवडणुका घोषित केल्या होत्या. पण राज्यात पावसाने थैमान घातले आहे. आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अजून प्रलंबित असल्याकारणाने सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीला स्थगिती मिळावी अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुध्दा याबद्दल निवडणूक आयोगाशी चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे शिंदेंनी चर्चा केली यामुळेच ही स्थगिती मिळाली की काय याबद्दल अद्याप माहिती मिळू शकलेली नाही आहे.
पण आता निवडणूका ह्या ओबीसीं अरक्षणासोबतच होतील याची आता दाट शक्यता आहे.आज १७ जिल्ह्यातील ९२ नगर परिषदा आणि ४ नगरपंचायच्या निवडणूकिला स्थगिती निवडणुक आयोगाकडूनच देण्यात आली आहे . निवडणूक आयोगाचे पुढील आदेशापर्यंत ही स्थगिती देण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आता झालेल्या ओबीसी आरक्षण सुनावणीत पुढील आदेशपर्यंत निवडणूक कार्यक्रम जाहीर करू नका असे निर्देश राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला दिले होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ह्या ओबीसी अरक्षण लागू होऊनच होतील अशी दाट शक्यता आहे.