नाशिकच्या आधार आश्रमातील चिमुकल्याच्या हत्येचा उलगडा..!

नाशिक : आधार आश्रमातील ४ वर्षीय चिमुकल्याच्या हत्येप्रकरणी एका अल्पवयीन संशयीतास अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आधार आश्रमात एका चार वर्षीय बालकाची गळा आवळून हत्या झाली होती. या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याची मोठ्या भावासोबत झालेल्या भांडणाचा राग काढण्यासाठी हत्या करण्यात आली आहे. दरम्यान हत्येची कबुली दिल्यानंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पोलिसांनी या प्रकरणातील १६ वर्षीय अल्पवयीन संशयिताला अटक केली आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या आधार तीर्थ आश्रमामध्ये एका लहान मुलाचा गळा दाबून हत्या करण्यात आली होती. (A child was strangled to death in the Aadhaar Tirtha Ashram for children of suicidal farmers). या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. नाशिकच्या त्रंबकरोड परिसरातील अंजनेरी भागात हे आधार तीर्थ आश्रम आहे (Aadhaar Tirtha Ashram in Anjaneri area of ​​Trambakarod, ​​Nashik). या आश्रमात राज्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं राहतात. मात्र या आश्रमातील एका चिमुकल्याची अशाप्रकारे हत्या झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. घटना उघडकीस येताच याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी याबाबत तपास केला असता मोठ्या भावासोबत झालेल्या भांडणाचा राग ४ वर्षाच्या चिमुकाल्यावर काढण्यात आला आणि त्याची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला मुलींसाठीच्या त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील हा धक्कादायक प्रकार आहे. या लहान मुलाच्या संशयास्पद मृत्यूची बातमी मिळताच पोलिस घटनास्थळीदाखळ झाले होते. पोलिसांच्या तपासानंतर या चिमुकल्याची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आणि आज या हत्येचा उलगडा झाला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मृत चिमुकला अवघ्या चार वर्षांचा असून तो उल्हासनगर येथील होता. त्याचा माेठा भाऊ देखिल याच आश्रमात हाेता. दरम्यान, एका अल्पवयीन मुलाचे या लहान मुलाच्या मोठ्या भावासोबत भांडण झाले हाेते(A boy in ninth standerd had a fight). त्यातूनच ही हत्या झाली असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर असलेल्या तुपादेवी गावाजवळ अंजनेरी येथे हे आश्रम आहे. या आश्रमात मध्यरात्री ही घटना घडली होती.

हत्येच्या घटनेनंतर संशयित आणि हत्या झालेल्या लहान मुलाच्या भावाच्या भांडणाची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे या हत्येच्या भांडणाशी संबंध असल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्या दिशेने तपास केला असता या हत्येचा उलगडा अखेर झाला आहे.