पहिल्या हरितक्रांतीचे जनक ‘डॉ. एम. एस. स्वामीनाथन’ काळाच्या पडद्याआड

नाशिक तक:- पहिल्या हरितक्रांतीचे जनक डॉ. एम एस स्वामीनाथन यांचे गुरुवारी चेन्नई येथे निधन झाले. वयाच्या ९८ वर्षी चेन्नई येथे डॉ. एम एस स्वामीनाथन यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. स्वामीनाथन(DO M.S SWAMINATHAN) यांच्या पाश्चात त्यांची पत्नी आणि तीन मुलं सम्या स्वामीनाथन, मधुराज स्वामीनाथन, आणि नित्य स्वामीनाथन असा परिवार आहे. जास्त प्रमाणात उत्पन्न देणाऱ्या धान्यांच्या जाती विकसित करण्यात स्वामिनाथन यांचं मोठं योगदान होतं. डॉ. एम एस स्वामीनाथन हे एम एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनच्या संस्थापक होते.

पाहुयात डॉ स्वामीनाथन कोण होते.

डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 रोजी तामिळनाडू राज्यातील कुंभकोणम(KUMBHKONAM) येथे झाला होता. 2007 ते 2013 या कालावधीत डॉक्टर स्वामीनाथ एम एस स्वामीनाथन यांनी राज्यसभा सदस्यत्व पद भूषवले होते.

डॉ. एम. एस. स्वामीनाथन हे भारतातील कृषी शास्त्रज्ञ होते भारतात हरितक्रांती(The Green Revolution) घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता त्यांनी कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी एम एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली आहे भारत सरकारने डॉक्टर सांबशिवन स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्वामीनाथन आयोगाची स्थापना केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण आहे.

Post
See new posts
Conversation
Eknath Shinde – एकनाथ शिंदे
@mieknathshinde
भारताच्या हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे सुप्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. एमएस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनची स्थापना करीत त्यांनी गव्हाचे उच्च उत्पन्न देणारे बियाणे विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

स्वामीनाथन यांनी विविध कृषी संशोधन प्रयोगशाळांमध्ये प्रशासकीय पदे भूषवली आणि क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या निधनाने देशाच्या कृषी क्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.

परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच त्यांच्या कुटूंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.

विविध राजकीय नेत्यांनी डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.