Home » पर्यावरणप्रेमींचा लढा यशस्वी! त्र्यंबकेश्वरचा काही परिसर संवर्धन राखीव क्षेत्र घोषित

पर्यावरणप्रेमींचा लढा यशस्वी! त्र्यंबकेश्वरचा काही परिसर संवर्धन राखीव क्षेत्र घोषित

by नाशिक तक
0 comment

नाशिक : त्र्यंबकेश्वरचा काही परिसर संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे (Some areas of Trimbakeshwar have been declared as conservation reserves). त्यामुळे येथील डोंगर दऱ्या सुरक्षित राहण्यास आणि निसर्ग पर्यावरणाचा ऱ्हास थांबण्यास मोठी मदत होईल. ब्रह्मगिरी भागात होणारे उत्खनन चर्चेत आल्यानंतर पर्यावरण प्रेमींनी याविरुद्ध लढा दिला होता. त्यामुळे हा निर्णय समोर आल्यानंतर पर्यावरण प्रेमी आनंद व्यक्त करत आहे. ब्रह्मगिरीची हिरवळ टिकवणे आणि गोदावरीचे पावित्र्य (Godavari River) वाढविण्यासाठी हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधील (Trimbakeshwar and Nashik) पर्यावरण प्रेमींनी दिलेल्या लढ्याला मोठे यश आले आहे.

गेल्या वर्षी त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी (Brahmagiri, Trimbakeshwar, Nashik) भागात होणार्‍या उत्खननावर (Excavations in Brahmagiri area) निसर्गप्रेमींनी (nature lover) तीव्र नाराजी व्यक्त केली होती आणी अखेर हा विषय कोर्टापर्यंत गेला होता. यासाठी पर्यावरण प्रेमींनी सातत्याने लढा दिला होता. तर जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह, वनमंत्री, वनसचिव आणि निसर्गप्रेमींची बैठक पार पडली होती. जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह वनमंत्री, वनसचिव आणि निसर्गप्रेमींच्या बैठकीनंतर आता यावर शासनाने राजपत्रद्वारे सूचना काढत त्र्यंबकेश्वर परिसरातील जवळपास १०० चौरस किलोमीटर परिसर संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून जाहीर (100 square kilometers area declared as conservation reserve area) केला आहे. त्यानुसार आता त्र्यंबकेश्वरच्या परिसरासह ब्रम्हगिरी आणि गंगाद्वारचा (Gangadwar) परिसर देखील संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित झाला आहे. तर काही नागरिक गाव, सर्वे क्रमांक, गट क्रमांक राखीव क्षेत्र याची माहिती मिळविण्यासाठी शासनाचे राजपत्र चाळत आहेत.

ब्रह्मगिरीची हिरवळ टिकवणे आणि गोदावरीचे पावित्र्य वाढविण्यासाठी हा निर्णय महत्वाचा मानला जात असून त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधील पर्यावरण प्रेमींच्या याच लढ्याला मोठे यश आले आहे. तर निसर्गप्रेमींकडून या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे. या निर्णयामुळे त्र्यंबकेश्वरचा (Trimbakeshwar) काही परिसरातील डोंगर, दऱ्या सुरक्षित राहण्यास आणि निसर्ग पर्यावरणाचा ऱ्हास थांबण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे आनंद व्यक्त केला जात आहे. त्यासोबतच वनविभागाच्या (Forest Department) अखत्यारीत त्र्यंबकेश्वर, हरसूल (Harsul) आणि नाशिक क्षेत्राचा काही भाग येतो. तसेच पूर्वी वाढोलीपासून (Wadholi) ते त्र्यंबकेश्वरपर्यंत अभयारण्य (sanctuary) होते. मात्र सध्या तसे राहिले नसल्याची चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!