घातक मंकीपाँक्सचा पहिला रुग्ण या राज्यात आढळला, आरोग्य विभाग सतर्क

देश आता कुठे कोरोनाच्या महामारीतुन सावरत असताना आता नवीन संकट देशावर घोंगावताना दिसत आहे.कोरोनापेक्षा घातक असा मंकीपाँक्सचा देशात शिरकाव झाल्याने स्पष्ट झाले आहे.संयुक्त अरब अमिरातीवरून परतलेल्या तरुणाला मंकीपाँक्सची लागण झाली आहे.या तरुणावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार चालू आहेत. तरुणाची स्थिती सध्या स्थिर आहे.केरळ मध्ये मंकीपाँक्सचा रुग्ण आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर प्रशासक सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने देखील या विषाणूपासून बचावासाठी चाचण्या तसेच इतर उपाय योजनांसाठी केरळमध्ये मल्टी डिसीप्लिनरी सेंट्रल टिम सतर्क ठेवली आहे. ही केरळ सरकारला सर्वतोपरी मदत करणार आहे.


हा रुग्ण केरळचा आहे. तो १२ जुलै रोजी संयुक्त अरब अमिरातीवरून पुन्हा केरळ मध्ये परतला आहे. हा तरुण केरळात त्रिवेंद्रम विमानतळावर उतरला होता अशी माहिती केरळच्या आरोग्यमंत्री विना जॉर्ज यांनी दिली. जागतिक आरोग्य संस्था तसेच आयसीएमआर यांनी दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळून खबरदारी घेतली जात आहे. असेही त्यांनी सांगितले. पुढे त्यांनी माहिती दिली की केरळ आरोग्य विभागाने तातडीने मंकीपाँक्स विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात मार्गदर्शन तत्वे लागू केली आहे.


सध्या तरुणाची तब्येत स्थिर आहे. तरुणाला कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही. सोबतच तरुणाच्या संपर्कात असलेल्या सर्वांची चाचणी करण्यात आली आहे, घाबरण्याचे काही कारण नाही असे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. कोरोना नंतर आता जगात मंकीपाँक्सने थैमान घातले आहे. हा विषाणू दक्षिण आफ्रिकेत सर्वात पहिले आढळला होता त्याने आता भारतातही शिरकाव केला आहे. हा अतिशय भयानक विषाणू असून सुरुवातीला ताप, डोकेदुखी, नंतर सूज, पाठदुखी,, स्नायुमध्ये वेदना आणि अस्वस्थापणा मग संपूर्ण शरीरावर पुरळ यायला सुरुवात होते.

प्राण्यांना जर हा आजार झालेला असेल आणि त्यांचाशी थेट संबंध आला तर याचा संसर्ग मानवाला होतो. प्राण्यामधून हा विषाणू मानवाच्या शरीरात प्रवेश करतो.त्यानंतर साधारणता २१ दिवसांच्या आत मानवाला लक्षणे दिसू लागतात.

आतापर्यंत मंकीपाँक्सचे जगभरात ३४१३ प्रकरणे समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार यावर्षी जानेवारीत १ ते २२ जून या कालावधीत जगभरातील ५० देशांमध्ये मंकीपाँक्स चा संसर्ग झालेले ३४१३ रुग्ण आढळून आलेली आहेत. आता भारतात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.