ठाकरे घराण्यातील पहिला व्यक्ती शिंदे गटात!

Edited By: Pavan Yeole
एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांनी वेगळी भूमिका घेऊन राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन केले. आणि त्यानंतर शिवसेनेतून शिंदे गटात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ खासदारही शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेनेतील अनेक नगरसेवक, सरपंच, पदाधिकारी कार्यकर्ते हे शिंदे गटात सामील होत आहे . असे असताना आता ठाकरे घराण्यातील एका व्यक्तीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. या अगोदर स्मिता ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या होत्या आता ठाकरे घराण्यातील निहार ठाकरे यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला असून ते ठाकरे घराण्यातील पहिले व्यक्ती आहे. निहार ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जी काही कायदेशीर मदत लागेल ती करण्यासही तयार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता निहार ठाकरे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. जर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला तर ते शिंदे गटात जाणारे ठाकरे घराण्यातील पहिलेच व्यक्ती असू शकतात.



कोण आहेत निहार ठाकरे

शिंदे गटाला पाठिंबा देणारे निहार ठाकरे महाराष्ट्राला पूर्णपणे अजून परिचित नाहीत .आणि निहार ठाकरे हे राजकारणात अद्यापही सक्रिय देखील नाहीत .निहार ठाकरे हेपेशाने वकील देखील आहेत. निहार ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे बिंदू माधव ठाकरे, उद्धव ठाकरे ,जयदेव ठाकरे, हे तीन पुत्र आहेत त्यातीलच बिंदू माधव ठाकरे यांचे निहार ठाकरे पुत्र आहेत. त्यामुळे शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे गटाला पाठिंबा देणारे ठाकरे घराण्यातील नियर ठाकरे हे पहिलेच व्यक्ती आहेत.

वेगवेगळ्या पक्षात गणगोत

निहार ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असून बिंदू माधव ठाकरे यांचे पुत्र आहेत. निहार ठाकरे यांचे सख्खे काका म्हणजेच उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत तर चुलत भाऊ आदित्य ठाकरे हे शिवसेनेतील युवा नेते असून ते आमदार आहेत तर. निहार ठाकरे यांचे सासरे हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये आहेत तर निहार यांची पत्नी अंकिता पाटील काँग्रेसमध्ये आहे.त्या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. आणि त्यांचे चुलत काका राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत.