शहरातील ‘या’ प्रसिद्ध दुकानावर वनविभागाची कारवाई

नाशिक : नाशिक शहरातील प्रसिद्ध अश्या दुकानात वनविभागाने कारवाई केली आहे. या कारवाईत या दुकानात अन्य प्राण्यांचे अवयव आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात वनविभागाकडून प्राथमिक माहिती मिळाली असून, पुढील तपास सुरु आहे.

शहरातील प्रसिद्ध अश्या दगडू तेली दुकानात वनविभागाने कारवाई केली आहे. वन्य प्राण्यांचे अवयव आले आढळून रविवार कारंजा परिसरातील प्रसिद्ध अश्या दगडू तेली दुकानावर कारवाई करण्यात आली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी आपल्या राउंड स्टाफ यांच्या समवेत या दुकानात धाड टाकली. दरम्यान, या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत मिळून आलेले वन्य प्राण्यांचे अवयव अधिक तपासासाठी प्रयोग शाळेत पाठवण्यात आल्याची माहिती, वनविभागाने दिली आहे. या घटनेप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.